
गुढीपाडवा पट वाढवा उपक्रम आरेवाडी शाळेत संपन्न
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सूचित केले प्रमाण गुढीपाडवा पट वाढवा हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शा ळा आरेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला आणि शंभर टक्के विद्यार्थी शाळेमध्ये दाखल करून घेण्यात आले. या विद्यार्थ्यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पाटी पेन्सिल व शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
आपल्या गावातील सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल करून घ्यावे यासाठी सातारा जिल्हा परिषदेने हा उपक्रम राबवला आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.कराड तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी बीपीन मोरे यांनीही या हा उपक्रम राबवण्याच्या सूचना सर्व शिक्षकांना दिल्या होत्या. याप्रमाणे हा उपक्रम आरेवाडी शाळेमध्ये राबवण्यात आला. सदर उपक्रमाचा शुभारंभ सरपंच मधुकर यादव उपसरपंच विजय जाधव सोसायटीचे अध्यक्ष विलास देसाई शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विभूती यादव मुख्याध्यापक अंकुश नांगरे विकास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या शाळेच्या भौतिक तसेच शैक्षणिक सुविधा आणि उपक्रम या शाळेचा नावलौकिक वाढवत आहेत.
फोटो कॅप्शन : आरेवाडी जि. प.शाळा नवीन विद्यार्थी दाखल करताना सरपंच उपसरपंच व इतर मान्यवर.