कराड पूर्व भागाचा रामकृष्ण वेताळ यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार

कराड पूर्व भागाचा रामकृष्ण वेताळ यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार
कराड :ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा कराडचा स्वाभिमान असून या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कराड तालुक्याचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार कराड पूर्व भागातील गावांनी केला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल चा प्रचारार्थ रामकृष्ण वेताळ यांनी पूर्व भाग दौरा केला
या दौऱ्यात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात सभासदांचा पाठिंबा मिळत आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ऐन रंगात आली आहे.सर्व उमेदवार आणि पॅनल प्रमुख पायाला भिंगरी बांधून प्रचारांमध्ये उतरले आहेत.प्रचाराचे शेवटचे दोन दिवस बाकी उरलेले असल्याने आता प्रचाराने खरा वेग घेतला आहे.भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वाखालील स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलने सध्या प्रचारात आघाडी घेतली आहे.आज वाघेरी,करवडी, वडोली निळेश्वर,शहापूर,नडशी, शिरवडे,कोपर्डे हवेली यासह पूर्व भागाचे गावांचा सभासद भेट दौरा केला.यावेळी रामकृष्ण वेताळ यांच्याबरोबर उमेदवार दिनकर पिसाळ,शैलेश चव्हाण,जयसिंग डांगे, शिवाजीराव चव्हाण यांची उपस्थिती होती.
या सर्वांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन सह्याद्री सहकारी साखर कारखाना स्वाभिमानी कराडकर यांची अस्मिता असून तो कराडकरांचा राहिला पाहिजे यासाठी सभासदांनी मोठ्या प्रमाणावर सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले.पूर्व भागातील सर्व गावांमधून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत होता. सकाळी नऊ पासून सुरू झालेला त्यांचा दौरा रात्री उशिरापर्यंत चालू होता.अनेक लोक उस्फूर्त फणे त्यांच्या या दौऱ्याला पाठिंबा देत होते.सह्याद्रीचा रणसंग्राम शिगेला पोचला असून रामकृष्ण वेताळ यांच्या दौऱ्याला अनोखे यश लाभत असल्याने आणि कराडचा स्वाभिमान जपण्यासाठी सभासद सरसावले असल्याने निवडणुकीत रंगत पाहायला मिळत आहे.