
‘आहेर अभियांत्रिकी’मध्ये स्पेक्ट्रम २०२५ स्पर्धा उत्साहात
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
येथील डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शुक्रवार (दि. २८) मार्च रोजी स्पेक्ट्रम २०२५ ही प्रोजेक्ट, तसेच कोड वार, कॅड मास्टर प्रोटोटाईप मॉडेलिंग क्वीझ पोस्टर यांसारख्या विविध तांत्रिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुमारे ७०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
या सर्व स्पर्धांचा मुख्य उद्देश सांगताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्वर मुल्ला म्हणाले, हे प्रदर्शन भरवून सर्व स्पर्धकांना योग्य पद्धतीने गुणांकन करू विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस आणि सर्वांना प्रोत्साहन देणे, हा यामागचा उद्देश होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कराड विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते होते. विद्यार्थांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब मोहिते म्हणाले, विद्यार्थांनी प्रकल्प तयार करताना त्याचा सामान्य माणसांचे जीवन अधिक सुखकारक कसे होईल, यावर भर द्यावा. विजेचा वापर करताना जेवढी गरज असेल, तेवढीच वापरली पाहिजे. अन्यथा भविष्यात आपणाला मोठ्या प्रमाणावर प्रदुषणास सामोरे जावे लागेल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक गुजर यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थांनी देश महासत्ता होण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक तत्रंज्ञानाचा वापर करून निर्माण होणारे प्रकल्प समाजातील तळागाळातील लोकांना कसे उपयुक्त होतील, या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजदीप यादव व प्रा. पवन लोकरे, सुत्रसंचालन प्रा. अर्चना मुळीक व प्रा. शिफा शिकलगार, स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष इंद्रजीत गुजर व सचिव डॉ. माधुरी गुजर यांच्या यांनी केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. एच. एम. कुंभार, डॉ. व्ही. एम. जमादार, सर्व विभागप्रमुख शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.