मरळी येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन : पालकमंत्री शंभूराजे देसाई

मरळी येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन : पालकमंत्री शंभूराजे देसाई
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
दौलतनगर मरळी, ता. पाटण येथे 15, 16 व 17 एप्रिल या तीन दिवशी जिल्ह्यात प्रथमच ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सवा’ चे आयोजन केल्याची माहिती पर्यटन, खणीकर्म मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासन, पर्यटन विभाग, जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समिती पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केल्याचे ही देसाई यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, जिल्हा कृषी अधिकारी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर उपस्थित होते.
या महोत्सवात सलग तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कृषी प्रदर्शन, फूड फेस्टिवल, फनफियर, बोटिंग हॉर्स रायडिंग, पॅराग्लायडिंग, डोंगरी खाद्य महोत्सव आयोजित आयोजित करण्यात आल्याचे सांगून मंत्री देसाई म्हणाले या महोत्सवात पशुपक्षी प्रदर्शन अंतर्गत तीन दिवस रोज नवनवीन पक्षी प्राणी यांचे प्रदर्शन व स्पर्धा घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर डोंगरी खाद्य महोत्सव अंतर्गत महिला बचत गटांनी बनवलेल्या साहित्यांची खरेदी विक्री त्याचबरोबर डोंगरी भागातील महिलांनी बनवलेले विविध खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे.
सातारा जिल्ह्यात विशेष करून ज्या भागात बांबू लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे त्या ठिकाणी बांबू पासून बनवलेल्या विविध वस्तू खेळणी यांचेही प्रदर्शन आयोजित केले असल्याचे सांगून मंत्री देसाई म्हणाले, या महोत्सवात खास इलेक्ट्रिक बगी प्रथमच शामिल होत असून शताब्दी हॉल ते कारखाना परिसरात याचा लाभ महोत्सवात येणाऱ्यांना घेता येणार आहे. 17 17 एप्रिल रोजी या महोत्सवाचा समारोप होणार असून समारोप दिनी महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून यात विविध प्रकारच्या लोककला सादर करण्यात येणार आहेत तत्पूर्वी तीन दिवस झालेल्या महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात प्रथमच तीन दिवस आयोजित केलेल्या या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही मंत्री शंभूराजे देसाई यांनी केले आहे.
सहकारातील संस्थांमध्ये पक्षीय राजकारण होत नसल्याने स्थानिक पातळीवर या निवडणुका होत असल्याचे एका प्रश्नावर सांगून मंत्री देसाई म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माहिती एकत्रितपणाने लढणार असून ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य दिले जाईल असेही ते एका प्रश्नावर म्हणाले. सध्या महायुतीची ताकद वाढत असून लवकरच उद्धव ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.