काँग्रेसच्या मेळाव्यात पी. डी. पाटील पॅनलला पाठिंबा

काँग्रेसच्या मेळाव्यात पी. डी. पाटील पॅनलला पाठिंबा
कराड :ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विचारांच्या सभासद मेळाव्यात, सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत, माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या “पी. डी पाटील पॅनल” ला काँग्रेसच्या सभासदांनी एकजुटीने पाठिंबा जाहीर केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य श्री नामदेव पाटील होते.
हॉटेल विट्स सत्यजित, येथे पार पडलेल्या सदर मेळाव्यात, कराड, सैदापूर, कार्वे, कापील, मलकापूर, वारुंजी, गोटे, खोडशी, वनवासमाची, वहागाव सह कराड तालुक्यातील विविध गावातील कारखान्याचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर मेळाव्यात बोलताना नामदेव पाटील यांनी आपल्या मनोगतात, सह्याद्री कारखाना सर्वात जास्त दर देणारा कारखाना असल्याचे नमूद करून ऊस तोडीचे नियोजन स्ट्रिक्ट असल्याचे सांगितले. नोंदीप्रमाणे ऊस-तोड होत आहे. इतर कारखाने सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रात बिन नोंदणीचा ऊस नेत असतात.सह्याद्रीची तोड १५ दिवसांनी येणार असेल तर आधीच ऊसतोड करून रिकामे होतात. सह्याद्रीची ऊस तोड नियमित प्रोग्रॅम प्रमाणे होते.
बाळासाहेबांच्या हाती कारखाना सुरक्षित आहे.जर सत्ता बदल झाला,तर विरोधक कारखान्याची अवस्था इतर कारखान्यासारखी करतील. विरोधकांना राजकीय अड्डा म्हणून कारखान्याचा वापर करायचा आहे, बाळासाहेबांनी कारखाना वाढवला नाही नवीन युनिट गतीने काढले नाही.त्याचे काम कासवाच्या गतीने आहे. परंतु, भरवशाचे आहे. येत्या ५ तारखेला पी. डी. पाटील पॅनलला, प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
अशोकराव पाटील यांनी कराड आणि पंचक्रोशीतील ८० टक्के होऊन अधिक सभासद पी. डी. पाटील पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विरोधकांना उमेदवारी ही सापडत नव्हते, असे सांगितले. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचीच एक मुखी आणि खंबीर नेतृत्व सह्याद्री कारखान्यास पर्यायने सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रगतीच्या, दिशेने घेऊन जाईल असा विश्वास व्यक्त केला.
जयवंत जगताप म्हणाले, सह्याद्री कारखाना टिकला पाहिजे, चांगला चालला पाहिजे,वाचवला पाहिजे म्हणून, पी.डी.पाटील पॅनलला मतदान करायचे आवाहन केले, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माननीय श्री अजितराव पाटील चिखलीकर (आप्पा) यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करून पी डी पाटील पॅनलला बिनशर्त पाठिंबा दर्शवण्यासाठी,bहात उंचावण्याचे आव्हान केले.
प्रशांत पवार यांनी कराड उत्तरची काँग्रेस कदापी भाजपाच्या दावणीला बांधली जाणार नाही,याची ग्वाही दिली. काँग्रेसच्या विचाराच्या सभासदांनी येत्या निवडणुकीत पी. डी. पाटील पॅनलला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी आनंदराव घोडके, दुर्गेशराव मोहिते, डॉ. शंकरराव पवार, संदीप भास्करराव शिंदे, सचिन पाटील, बाळासाहेब पाटील, जगदीशचंद्र ज्ञानदेव पाटील, भास्करराव पाटील
आदी मान्यवर सभासदांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विजय माने यांनी केले. शिवाजीराव पाटील यांनी आभार मानले.