आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा राजकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
राजकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोयना वसाहत येथील कृष्णा स्कुलच्या प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आ. डॉ. भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रारंभी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर ते कृष्णा स्कुलच्या प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहिले. याठिकाणी केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सुदन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ उंडाळकर, कामगार आयुक्त नितीन पाटणकर, माजी जि. प. सदस्य रमेश पाटील, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, जे. डी. मोरे, मनोज पाटील, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, मलकापूरचे माजी नगरसेवक राजेंद्र यादव, शिवराज इंगवले, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, धनंजय पाटील, मोहनराव जाधव, महादेव पवार, सचिन पाचपुते, गजेंद्र पाटील, स्वाती पिसाळ यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, आरोग्यसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांकडूनही शुभेच्छा
राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक, ना. जयकुमार गोरे, गिरीश महाजन, आ. पंकजा मुंडे, आ. चित्रा वाघ यांच्यासह विधिमंडळातील मंत्री आणि आमदारांनी फोनवरून, तसेच समाजमाध्यमातून शुभेच्छा देऊन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचे अभिष्टचिंतन केले.