
कराड तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराड तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक बुधवारी पार पडली या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी, टाकणावळ, भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा योजना, तसेच संघटना बळकटीकरण यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत कराड तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपरी जावेद काझी, तर उपाध्यक्षपदी महादेव गिरीगोसावी यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव – धनंजय पोतदार, सहसचिव – गणेश देसाई व संजय माळी, खजिनदार – विश्वेश्वर मुळे, सह खजिनदार – अनिल पालेकर, विश्वस्त सल्लागार – गौतम काटरे, ज्येष्ठ मार्गदर्शक – गिरीश वैद्य, सन्माननीय सदस्य गिरीश धोत्रे, धर्मेंद्र पाटील, नागेश कोपर्डेकर, सारंग कत्ते, गणेश माळी, प्रवेश कोलपे, जगन्नाथ पवार यांचा नवीन कार्यकारिणीमध्ये समावेश आहे.