जीवनशैली

कराड बसस्थानकावर सुरक्षेच्या उपाययोजना करा : आमदार डॉ. अतुल भोसले

कराड बसस्थानकावर सुरक्षेच्या उपाययोजना करा
स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केली कराड बसस्थानकाची पाहणी
कराड:प्रतिनिधी –
स्वारगेट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शुक्रवारी येथील बसस्थानकावर पाहणी केली. तसेच शासकीय विश्रामगृहावर पोलीस, महसूल व एसटी प्रशासनाची बैठक घेऊन बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिने कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
आमदार डॉ. भोसले यांनी आज दुपारी येथील बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रांत अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, बसस्थानक प्रमुख शर्मिष्ठा पोळ, वाहतूक शाखेचे प्रमुख संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते. डॉ. भोसले यांनी बसस्थानकावरील सुविधांची पाहणी करत प्रवासी तसेच एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
तसेच आगारप्रमुख शर्मिष्ठा पोळ यांच्याकडून सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पोलीस, महसूल व एसटी प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत आढावा घेतला.
कराड बसस्थानकावर रोज ४० हजार प्रवासी ये-जा करतात. यात सुमारे १० हजार विद्यार्थी आहेत. कराड तालुका हा मोठा आणि आर्थिक सघन असल्याने बसस्थानकावर सुरक्षेच्या दृष्टिने पावले उचलली गेली पाहिजेते. बसस्थानकावरील पोलीस चौकीला जी जागा पूर्वीच्या आराखड्यात देण्यात आली होती, तीच देण्यात यावी. पोलीस चौकी मध्यभागी असल्याने संपूर्ण स्थानकावर नजर ठेवणे पोलिसांना शक्य होणार आहे. बसस्थानकात चोवीस तास पोलीस तैनात करण्यात यावेत, अशा सूचना आमदार डॉ. भोसले यांनी दिल्या.
बसस्थानकात अस्वच्छता असल्याने नाराजी व्यक्त करत बसस्थानकाला क्लिनिंग मशीन, डस्टबीन, वॉटर कुलर, बाकडी, साईन बोर्ड देण्याबाबत तातडीने प्रस्ताव द्यावा. बसस्थानकाच्या दर्जोन्नतीबाबतही प्रस्ताव द्यावा, त्यावर तातडीने कार्यवाही करणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. तसेच बसस्थानकात १५ सीसीटिव्ही असून आणखी किती लागतील, याचीही पाहणी करण्यात यावी. नव्याने देण्यात येणारे सीसीटिव्ही अद्ययावत व दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटचे फोटो काढणारे असतील. ते आमदार निधीतून देण्यात येतील, असे ते म्हणाले. बसस्थानकावरील. स्वच्छतागृहात प्रवासी वः महिलांना पैसे आकारण्यात येत आहेत. त्याबाबत डॉ. भोसले यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई करण्याची मागणी केली. बसस्थानकाबाहेरील अतिक्रमणांबाबत पालिकेला सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांनी केली नवीन बसेसची मागणी बसस्थानकात पाहणी करत असताना एसटी कर्मचाऱ्यांनी कराड आगाराला नवीन बसेस मिळवून देण्याची मागणी आमदार डॉ. भोसले यांच्याकडे केली. डेपोत अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व दत्त मंदिराला सभामंडपाचीही मागणी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »