क्रिडाजीवनशैली

कराडमध्ये ९ रोजी रस्ता सुरक्षा मॅरेथॉन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

कराडमध्ये ९ रोजी रस्ता सुरक्षा मॅरेथॉन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत रस्ता सुरक्षितते संदर्भात जनमाणसामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने रस्ता सुरक्षा मॅरेथॉन (दौड) रविवार 9 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यलयाचे अधिकारी चैतन्य कणसे, सामाजिक कार्यकर्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक रणजीतनाना पाटील व अतुल पाटील (सर) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांचे वतीने व रणजीतनाना पाटील मित्र परिवार यांच्या वतीने ही मॅरेथॉन प्रायोजित करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी सात वाजता लिबर्टी मजदूर मंडळ येथून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेमध्ये जवळपास अडीच हजार स्पर्धकांचा सहभाग असणार आहे. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
या स्पर्धेचा मार्ग लिबर्टी मैदान, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपासून सुरु होऊन विजय दिवस चौक, बसस्थानक, दत्त चौक, मुख्य बाजारपेठ, चावडी चौक , कन्या शाळा इथून पुढे कृष्ण नाकामार्गे कॉटेज हॉस्पिटल इथून पुढे विजय दिवस समारोह चौक व पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, लिबर्टी मैदान कराड येथे ही स्पर्धा संपेल.
सदरची स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटात असेल. सदरच्या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन मा. रणजीत पाटील नाना मित्रपरिवार यांनी केले आहे.
या स्पर्धेमधील सर्व सहभागी खेळाडूंना टी-शर्ट ,मेडल व नाश्ता दिला जाणार आहे.
स्पर्धेच्या दिवशी सकाळी पाच ते सात या वेळेत खेळाडूंना टी-शर्ट व नाश्ता दिला जाईल. त्यानंतर झुंबा सेशन होईल व मुख्य स्पर्धेत सुरुवात होईल. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविले जाईल. या स्पर्धेसाठी शासकीय अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर सर्व खेळाडू, नागरिक सहभागी असणार आहेत.तरी सर्वांनी स्पर्धेच्या अगोदर एक दिवसापर्यंत आपली नाव नोंदणी पूर्ण करावी, असे असे आवाहन उपप्रादेशिक कार्यालय कराड व रणजीतनाना पाटील मित्र परिवार कराड यांनी केले आहे.
नाव नोंदणीसाठी पुढील ठिकाणी संपर्क करावा.
१. संगम हेल्थ क्लब श्री मुरली वत्स
72 18 12 27 22

२. ए .पी स्पोर्ट्स
97 66 32 38 78

३. आरटीओ ऑफिस
योगेश कुंभार
97 30 63 21 14

४. लिबर्टी मजदूर मंडळ
96 0 49 48 584
99 70 63 98 77
५ शिवराय प्रतिष्ठान
7522927555

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »