स्व.जयवंतराव आप्पा व बेडकिहाळ यांचा सन्मान हाच यशवंत विचारांचा खरा जागर
स्व.जयवंतराव आप्पा व बेडकिहाळ यांचा सन्मान हाच यशवंत विचार
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक बाबी सोबतच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे बोट धरून सामाजिक बांधिलकी ही जोपासली आहे. संस्थेच्यावतीने या सोहळ्यात सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पा व जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांना ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करुन खऱ्या अर्थाने यशवंतविचारांचा जागर केला आहे. असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले. ते ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचा ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता सोहळा’ कराड येथील वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, विशेष अतिथी म्हणुन कृष्णा विश्वविद्यापिठाचे कुलपती डॉ.सुरेश भोसले उपस्थित होते. श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान सावकार, चेअरमन राजन वेळापुरे, अरुण जाधव,सौ.अलका बेडकिहाळ व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमास भारती विद्यापीठाचे सहसचिव डॉ.एम.एस सगरे, किशोर बेडकिहाळ, गोविंद बेडकिहाळ, किसनराव पाटील व कालिकादेवी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अनिल सोनवणे, संस्थापक संजय मोहिरे, संचालक शरदचंद्र देसाई,डॉ.जयवंत सातपुते, निरंजन मोहिरे, राजेंद्रकुमार यादव,सुरेश कोळेकर,जयाराणी जाधव,सीमा विभुते,औदुंबर कासार, शिरिष गोडबोले व परिवारातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.