यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे दि. १५ रोजी वितरण सहकार महर्षी स्व.जयवंतराव भोसले (आप्पा) यांना मरणोत्तर तर सन २०२२-२३ चा हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मा.डॉ.रविंद्र बेडकिहाळ (फलटण) यांना प्रदान करण्यात येणार - gramdaulat.com
जीवनशैलीश्रद्धा

यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे दि. १५ रोजी वितरण सहकार महर्षी स्व.जयवंतराव भोसले (आप्पा) यांना मरणोत्तर तर सन २०२२-२३ चा हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मा.डॉ.रविंद्र बेडकिहाळ (फलटण) यांना प्रदान करण्यात येणार

यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे दि. १५ रोजी वितरण
सहकार महर्षी स्व.जयवंतराव भोसले (आप्पा) यांना मरणोत्तर तर सन २०२२-२३ चा हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मा.डॉ.रविंद्र बेडकिहाळ (फलटण) यांना प्रदान करण्यात येणार

कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा सन २०२१-२२ ‘ यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार ’ सहकार महर्षी स्व.जयवंतराव भोसले (आप्पा) यांना मरणोत्तर समर्पित केला जाणार असुन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन अँड मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. सुरेश भोसले स्वीकारणार आहेत. तसेच सन २०२२-२३ चा हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मा.डॉ. रविंद्र बेडकिहाळ (फलटण) यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार दि.१५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता स्व.सौ वेणुताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह कराड येथे हा सोहळा होणार आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सिक्कीमचे माजी राज्यपाल मा.खा.श्रीनिवासजी पाटील भूषविणार असून राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा.आ.बाळासाहेब पाटील प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. कराड दक्षिणचे आमदार डॉ.अतुलबाबा भोसले विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहणार असून शिवम् प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मा.इंद्रजित देशमुख (काकाजी) विशेष आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी व श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित , रानकवि ना.धो.महानोर , ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे , नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची नाम संस्था पुणे , शांतीलाल मुथ्था ( पुणे ), मा. इंद्रजित देशमुख ( काकाजी ) , सिक्कीमचे माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील, आ.स्व.पी.डी.पाटील साहेब (मरणोत्तर), पद्मभुषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील(मरणोत्तर), यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
स्व.जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार व आरोग्य सेवेचा सन्मान हा पुरस्कार त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार मा.डॉ. रविंद्र बेडकिहाळ यांच्या ५६ वर्षातील पत्रकारितेचा व त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणुन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास संस्थेचे सभासद व परिसरातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे अवाहन श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार),चेअरमन राजन वेळापुरे, समन्वयक प्रा.अशोककुमार चव्हाण, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे व संचालक मंडळ सदस्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »