क्रिडाजीवनशैली

स्व.दादासाहेब मोकाशी यांच्या ७५ अमृत महोत्सवी जयंती निमित्ताने भव्य स्पर्धांचे आयोजन

स्व.दादासाहेब मोकाशी यांच्या ७५ अमृत महोत्सवी जयंती निमित्ताने भव्य स्पर्धांचे आयोजन
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान राजमाची संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, दादासाहेब मोकाशी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, दादासाहेब मोकाशी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दादासाहेब मोकाशी तंत्रनिकेतन, दादासाहेब मोकाशी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेस्टफिल्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. दादासाहेब मोकाशी यांच्या ७५ अमृत महोत्सवी जयंती निमित्ताने भव्य वक्तृत्व, निबंध लेखन व चित्रकला स्पर्धांचे आयोजन शुक्रवार दि. ०६/१२/२०२४ रोजी सकाळी १० ते सायं ०५ वा. शैक्षणिक संकुलामध्ये करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कराड व आसपासच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांमधील वेगवेगळया विषयावर आयोजन केले आहे. या स्वर्धेसाठी ८ वी ते १० वी पर्यंतची मुले व मुली पात्र असतील. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी रोख रक्कम व प्रमाणपत्र, प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे. तरी कराड परिसरातील सर्व इच्छुक स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा.
वरील स्पर्धेच्या आयोजनासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. अभिजीत मोकाशी व संस्थेचे डॉ. उपाध्यक्ष विश्वजीत मोकाशी यांचे प्रोत्साहन मिळाले असून स्पर्धेच्या विविध उपक्रमांसाठी संस्थेचे संचालक विलास चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन विविध घटक महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »