राजेंद्र नांगरे पाटील यांना राष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
काले तालुका कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक व सातारा जिल्हा रयत शिक्षक सेवक संघाचे अध्यक्ष राजेंद्र नांगरे पाटील यांना शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरचा राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने सन्माननीय करण्यात आले.
कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी व नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीने शैक्षणिक सामाजिक आशा सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. राजेंद्र नांगरे पाटील हे महात्मा गांधी विद्यालयात गेली पाच वर्षे सुपरवायझर म्हणून काम करत होते त्याच दरम्यान शाळेच्या इमारत बांधकामात त्यांनी सहकार्य केले. या वर्षापासून ते प्रभारी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती शाळेचे काम पाहत आहेत त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
बेळगाव येथील बिदर जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघण्णावार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. दिल्ली गुजरात कर्नाटक राजस्थान महाराष्ट्र गोवा आधी राज्यातील प्रभावी व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात येतो. या पुरस्काराबद्दल स्थानिक स्कूल कमिटी सदस्य दयानंद पाटील विकास पाटील माजी सरपंच संजय देसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पाटील, सातारा जिल्हा रयत शिक्षण संघ सर्व त सेवक बंद-भगिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.