जीवनशैली

शक्तीप्रदर्शनाद्वारे मनोज घोरपडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल कराड उत्तरचा विकास हाच अजेंडा: मनोज घोरपडे

शक्तीप्रदर्शनाद्वारे मनोज घोरपडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कराड उत्तरचा विकास हाच अजेंडा: मनोज घोरपडे
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.
त्यानंतर येथील कृष्णा नाक्यावरून दत्त चौकापर्यंत भव्य शक्तीप्रदर्शन करत मनोज घोरपडे समर्थकांनी रॅली काढली. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनोज घोरपडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर रॅली शिवतीर्थ दत्त चौकात आल्यानंतर या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनोज घोरपडे यांनी अभिवादन केले.
तदनंतर येथील कराड नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, चित्रलेखा माने-कदम, विक्रम पावसकर, भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी माध्यमांची संवाद साधताना उदयनराजे भोसले म्हणाले, मनोज घोरपडे हे शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व असून त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यावधींची विकासकामे आणली आहेत. त्यामुळेच पक्षाकडून त्यांना संधी मिळाली आहे. मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि आज समर्थकांनी हजारोंच्या संख्येत उपस्थिती लावल्याने ते निवडून आल्यात जमा आहेत. तसेच मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ हे एकत्र मिळून एक दिलाने प्रयत्न करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मनोज घोरपडे म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा बहुतांशी ग्रामीण भागाचा समावेश असलेला मतदारसंघ आहे. या ठिकाणी धनगरवाडी हणबरवाडी योजनेसाठी 2014 पासून निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे. ते माध्यमातून सध्या या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. तसेच पश्चिम भागातील तारळी उपसा प्रकल्प, तसेच हिंगोली उपसा सिंचन योजनेतून 50 मीटर हेड ऐवजी 100 मीटर हेडपर्यंत पाणी पोहोचवण्याची योजना प्रस्तावित आहे. योजना मार्गी लागेल लागल्यास मतदारसंघातील बहुतांशी शेतीचे पाण्याचा तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्नही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे मतदारसंघाचा संपूर्ण विकास हाच आमचा अजेंडा राहील. उत्तरेतील सर्व नेत्यांच्या समन्वयातून आपल्यावर भारतीय जनता पक्षाने ही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्या सहकार्याने एकदिलाने आम्ही सर्व मिळून काम करू, असेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »