यश बिचकर याची नौसेनेत निवड
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराड येथील यश राजेंद्र बिचकर याची भारतीय नौसेना विभागात वर्ग २ अधिकारी पदावर नुकतीच निवड झाली. यश बिचकर हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) विभागात शिकत होता.
आपल्याआई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरून यश ने नौसेना विभागात भरती झाल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याचे आजोबा सदाशिव सिताराम बिचकर हे सुद्धा स्वातंत्र्य सेनानी आहेत व त्यांचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्य मोलाचे बलिदान होते.
या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड.देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, एनसीसी प्रमुख प्रा.योगेश वाळुंज, सर्व प्राधपक व विद्यार्थ्यांनी यश व त्याच्या पालकांचे अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने त्यांचा सहकुटुंब सत्कार केला. यावेळी बोलताना संस्थाध्यक्ष ऍड.बुट्टे यांनी यशची निवड महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असून विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे असे संागून यशने देशसेवेच्या माध्यमातून आपले गाव, महाविद्यालय आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.कराड शहरासह परीसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.