कराड मर्चेंट दिवाळी वाहन महोत्सव ९ टक्के विशेष व्याजदर
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराड मर्चेंट संस्थेने दिवाळी सणानिमीत्त नवीन वाहन खरेदी करिता वाहनतारण योजना लागु केलेली असुन यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनाना विशेष अशा ९ टक्के व्याजदराने कर्ज वितरण करण्यात येणार आहेत.
कराड मर्चेंट संस्थचे संस्थापक श्री. सत्यनारायण मिणीयार यांच्या शुभहस्ते या योजने अंतर्गत दोन नविन वाहनाचे वितरण करण्यात आले यामध्ये युवा उद्योजक श्री. महेश पाटील याना टोयाटो लिजेंडर व श्री. अजय पावसकर याना स्कॉरपीओ या वाहनांचे चावी प्रदान कार्यक्रम घेण्यात आला यावेळी बोलताना मर्चट कुटुंब प्रमुख श्री. मिणीयार साहेब यानी या योजनेचा लाभ युवा उद्योजक, व्यावसायिक अशा सर्वस्तरातील लोकानी घ्यावा असे सांगितले तसेच महिला लघु उद्योजकासाठी ९.९० टक्के व्याजदराची कर्ज योजना हि लागु केलेली आहे या संधीचा महिलानी फायदा घ्यावा, संस्थेने ठेवीवर ९.१० विशेष व्याजदर व जेष्ठ नागरिकासाठी १०.१० टक्के व्याजदार लागु केलेला आहे त्याचा सर्व ग्राहकानी फायदा घ्यावा असे अवाहन केले
वाहन वितरण प्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अशोक माटेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बाजीराव यादव शाखा प्रमुख श्री. अरुण पवार व सर्व अधिकारी, सेवक उपस्थित होते.