तासवडे टोलनाक्यावर पंधरा लाखांची रोकड जप्त वाहन तपासणीदरम्यान तळबीड पोलिसांची कारवाई
तासवडे टोलनाक्यावर पंधरा लाखांची रोकड जप्त
वाहन तपासणीदरम्यान तळबीड पोलिसांची कारवाई; मशीन व्यवहारातील इसारत रक्कम असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
तळबीड, ता. कराड येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत तासवडे टोलनाक्यावर वाहन तपासणी पोलीस पथकाने पंधरा लाखांचे रोकड जप्त केली. शनिवार, दि. 26 रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अहमदाबाद (गुजरात) येथील व्यापाऱ्याच्या जीपमध्ये ही रोकड आढळून आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निवडणुकीच्या अनुषंगाने वाहनांची तपासणी सुरू असताना शनिवारी रात्री अडीच वाजण्याचा सुमारास पोलिसांना एका बोलेरो गाडीमध्ये बोलेरो जीपमध्ये क्र. (जी. जे. 27 इ. इ. 8738) पंधरा लाखांची रोख रक्कम आढळून आली.
याबाबत पोलिसांनी संबंधितांकडे चौकशी केली असता अहमदाबाद (गुजरात) येथील व्यापाऱ्यांची औषध, गोळ्या तयार करणारी मशीन बनवण्याची व विक्री करण्याची कंपनी आहे. त्यातील मशीन ही लाईफ केअर अमेरिका येथील कंपनीचे मालक राजेंद्रकुमार सुबुध्दी यांना आमची मशीन विक्री करणार असून त्यांच्या बंगलुरु येथील एम्पोलॉई बिख्यात कुमार नायर यांच्याशी त्याबाबतचा व्यवहार झाला असून सदरची रक्कम ही त्या व्यवहाराची असल्याची माहिती संबंधित व्यापाऱ्यांनी पोलिसांना दिली.
याबाबत तळबीड पोलिसांनी कराड उत्तरचे 259 भरारी पथकाला पाचारण करून गाडी रोख रक्कमेसह पोलीस ठाण्यात आणून याबाबत कायकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले असून त्यांना पुढील पडताळणी करण्यास सांगितले आहे. दरम्यान सदरची रक्कम ही भरारी पथकासमक्ष व्हीडीओ चित्रीकरण करुन ताब्यात घेवून ट्रेझरीमध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आली आहे. नक्की ती रक्कम कोणत्या करण्यासाठी आणली होती, याबाबत अधिक चौकशी करण्यात येणार आहे. सदर रक्कमेबाबत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, पो. हवा. भोसले, पो.ना. दिक्षीत, पो.कॉ. मोरे, पो.कॉ. राठोड, पो.कॉ. कुंभार, पो.कॉ. गायकवाड (चालक) म.पो.कॉ. कुंभार, म.पो.कॉ- सत्रे यांनी केली.