कराड उत्तरमध्ये स्थिर पथके तैनात
कराड उत्तरमध्ये स्थिर पथके तैनात
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. त्यानूसार भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने निवडणूक प्रक्रिया मुक्त, शांततापूर्ण वातावरणात संपन्न होण्यासाठी सर्व मतदान मतदारसंघात विविध ठिकाणी स्थिर पथके तैनात करण्यात आले आहेत.
या पथकांद्वारे कराड उत्तर मतदार संघात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करून विनापरवाना 50 हजारांपेक्षा जास्त रोकड, मद्य, शस्त्रे वाहतूक किंवा इतर संशयास्पद वस्तूंची तपासणी केली जाणार आहे. या अगोदरच भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने 16 ऑक्टोबरपासून भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. भरारी पथके व स्थिर पथके 24 तास कार्यरत राहणार आहेत. नागरिकांनी निवडणूक आचार संहितेनुसार भरारी पथके व स्थिर पथके यांना आपल्या वाहनांची तपासणी करून देणे बंधनकारक आहे. अन्यथा, संबंधित नागरिकांवर निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याबद्दल कायदेशीर गुन्हे दाखल केले, जातील असे आदेश कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे, डॉ. जस्मिन शेख, अनिकेत पाटील व मध्यवर्ती अधिकारी शंकर खंदारे यांनी दिले आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 13 भरारी व 12 स्थिर पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.