शेतकरी कामगार पक्षाला महाविकास आघाडीमध्ये शेकापच्या पारंपारिक मतदार संघामध्ये उमेदवारी द्या
शेतकरी कामगार पक्षाला महाविकास आघाडीमध्ये शेकापच्या पारंपारिक मतदार संघामध्ये उमेदवारी द्या
शेतकरी कामगार पक्षाची जिल्हास्तरीय बैठक कराड येथे आज पार पडली
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
बैठकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला महाविकास आघाडीमध्ये शेकापच्या पारंपारिक मतदार संघामध्ये उमेदवारी द्या, अन्यथा तर वेगळा विचार करावा या मागणीसाठी शेकापचे कार्यकर्ते आक्रमक. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कामगार पक्षाचे काही निवडक पारंपरिक मतदारसंघ आहेत. शेकापचे रायगड मधील चार व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, तसेच नांदेड मधील लोहा कंधार मतदारसंघ, नागपूर जिल्ह्यातील काटोल हे शेकापचे पहिल्यापासून बालेकिल्ले राहिलेले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षासाठी या जागा सोडल्या नाहीत. यामुळे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक . शेकापच्या पारंपारिक मतदार संघात उमेदवार उभे करण्याची मागणी केली. तसेच सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर , पाटण,या मतदार संघासह इतर ठिकाणीही शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार उभे करणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष एडवोकेट भाई समीर देसाई यांनी केले. या बैठकीमध्ये भाई एम आर जाधव ,भाई दिनकर गुरव, भाई अनिल जगताप, भाई संभाजीराव जाधव, भाई युवराज मस्के, भाई हैबतराव पवार ,भाई गणेश जगताप, या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.