जीवनशैली

स्वतःवरील विश्वास यशस्वी माणसांच्या यशाचे गमक इंद्रजीत देशमुख; ‘सेवानंद’ या ‘मर्चंट सेवक गौरव विशेषांकाचे प्रकाशन उत्साहात

स्वतःवरील विश्वास यशस्वी माणसांच्या यशाचे गमक इंद्रजीत देशमुख; ‘सेवानंद’ या ‘मर्चंट सेवक गौरव विशेषांकाचे प्रकाशन उत्साहात
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
यशस्वी माणसांच्या यशाचे गमक हे दुसऱ्याचे मत ऐकून घेण्यात आणि होय! हे मी करु शकतो, या स्वतःवरील विश्वासात आहे, ते सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे, असे मत शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांनी केले.
मर्चंट कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार यांच्या संकल्पनेतून कराड मर्चंट व महिला मर्चंट या संस्थांतील
सेवकांचा उचित गौरव करण्याच्या हेतूने ‘सेवानंद’ या मर्चंट सेवक गौरव विशेषांकाची निर्मिती करण्यात आली आहे. या विशेषांकाचे प्रकाशन शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते व शिवमुद्रा फाऊंडेशनचे (पुणे) सुरेश उमाप, कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्या उपस्थितीत अर्बन शताब्दी सभागृह, कराड येथे नुकतेच पार पडले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
श्री. देशमुख म्हणाले, कोणत्याही ठिकाणी सेवा बजावत असताना काही मुल्ये जपली पाहिजेत. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक काम तत्परतेने केले पाहिजे. तसेच आपण केलेल्या कामाच्या परिणामावर लक्ष ठेवून प्रभावी अमंलबाजवणी करत नेमक्या कामाला प्राथमिकता देत कायमस्वरुपी संवाद कौशल्याचा वापर करता आला पाहिजे. नवनवीन नियमावली आत्मसात केली पाहिजे. श्री. मीणीयार यांच्यासारखे नेतृत्व तुम्हाला लाभले, हे तुमचे भाग्य असून त्यांनी केलेल्या कामात उत्कृष्ट संस्था निर्मिती, सामाजिक दातृत्व, एक कर्तृत्व संपन्न नेतृत्व पहायला मिळते. त्यांचा तुम्ही सर्वांनी आदर्श घ्यावा.
श्री. सुरेश उमाप म्हणाले, या जगामध्ये लोकांच्या हाताला काम देण्याइतके मोठे काम दुसरे होऊ शकत नाही. कराड मर्चंट संस्थेने सेवकांच्या साथीने उद्योजकीय साहित्य संमेलनासारखे अनेक स्तुत्य उपक्रम राबविले. त्यात त्याचे कामाची तळमळ दिसुन येते. प्रकाशन प्रसंगी बोलताना कराड अर्बन बँकेचे
श्री. दिलीप गुरव म्हणाले, मर्चंट ग्रुपचा आणि माझा जवळचा संबंध असून या संस्थान कडे आम्ही आमचे लहान भाऊ म्हणुनच पाहतो. मर्चंट संस्थेचे सर्व कर्मचारी प्रमाणिक आहेत. कबड्डीपट्टू असलेल्या श्री. मिणीयार यांच्यामध्ये खिलाडूवृत्ती आहे. खेळातील संघनायकाप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन ते काम करतात. सेवकांना त्यांच्या कामाचे संपुर्ण श्रेय देतात. त्यामुळे संस्थेतील त्यांचे पितामह नेतृत्व सिध्द होते. प्रत्येक सेवकांच्या लेखात खऱ्या परिस्थितीचे विवेचन केल्याने अंकाचे सेवानंद हे नाव सार्थ ठरते.
दरम्यान, महिला मर्चंटच्या संस्थापिका सौ. भारती मिणीयार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. सतिश जगदाळे यांनी आभार मानले. यावेळी मर्चंटचे चेअरमन माणिकराव पाटील, व्हा. चेअरमन शिवाजीराव जगताप, महिला मर्चंटच्या चेअरमन सौ. कविता पवार, व्हा. चेअरमन सौ. सुवर्णा सादिगले, सर्व संचालक, दोन्ही संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक माटेकर, पांडुरंग यादव, वसुली विभागप्रमुख राजाराम मोहिते, सर्व सेवक, हितचिंतक, सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »