दि कराड आर्किटेक्टेक्स अँड इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर २०२४ रोजी साजरा करण्यात येणार अभियंता दिन
श्री संतोष गजानन शेलार (मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्य) सर विश्वेश्वरय्या पुरस्काराने होणार सन्मानित
कराड :ग्राम दौलत न्युज-
दि कराड आर्किटेक्टेक्स अँड इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६:०० वाजता सौ वेणूताई चव्हाण स्मारक येथे ५७ वा अभियंता दिन कार्यक्रमाचे आयोजन केले असून यावेळी अभियंता श्री संतोष गजानन शेलार (मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्य) यांना सर विश्वेश्वरय्या पुरस्काराने, माननीय नामदार महेशजी शिंदे ( उपाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळ), डॉक्टर सुरेश भोसले (कुलगुरू कृष्णा विश्व विद्यापीठ), माननीय श्री इंद्रजीत देशमुख (संस्थापक शिवम प्रतिष्ठान), श्री आशिष बाळासाहेब नाईक (जनरल मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) टाटा प्रोजेक्ट लिमिटेड) या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कराड आर्किटेक अँड इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनीयर महेशकुमार पाटील, उपाध्यक्ष इंजिनियर मोहन चव्हाण, सेक्रेटरी आर्किटेक्चर जितेंद्र पानवळ, खजिनदार इंजिनियर मिलिंद पाटील, व असोसिएशनचे संचालक इंजिनियर राजेंद्र जाधव, इंजिनिअर चंद्रकांत पोळ, इंजिनिअर अमित उंब्रजकर, आर्किटेक्चर लक्ष्मण पांढरपट्टे, इंजिनिअर दिग्विजय जानुगडे, इंजिनीयर धैर्यशील यादव, इंजिनीयर श्रीधर इनामदार, इंजिनिअर रोहित शर्मा, इंजिनिअर शुभम सोनवणे यांनी दिली.
दि कराड आर्किटेक्टेक्स अँड इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर २०२४ रोजी श्री संतोष गजानन शेलार (मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्य) यांना सर विश्वेश्वरय्या पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार असून या कार्यक्रमाच्या वेळी जनरल मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) टाटा प्रोजेक्ट लिमिटेड, श्री आशिष बाळासाहेब नाईक हे महाराष्ट्र व मुंबईच्या विकासाचा मानबिंदू असलेल्या “अटल सेतू” या आधुनिक प्रकल्पाचे चित्रफितीमधील सादरीकरण करणार आहेत. तरी सदरच्या कार्यक्रमाची माहिती कराड व परिसरातील लोकांना मिळावी व कार्यक्रमाचा लाभ घेता यावा यासाठी आपण आपल्या दैनिकांमध्ये ही माहिती प्रसिद्ध करावी असे आवाहन ती कराड आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स च्या वतीने करण्यात आले.