प्रहारच्या जिल्हाअध्यक्षपदी मनोज माळी विधानसभेच्या निमित्ताने बाच्चूभाऊंकडून सातारा जिल्ह्याचा आढावा
प्रहारच्या जिल्हाअध्यक्षपदी मनोज माळी
विधानसभेच्या निमित्ताने बाच्चूभाऊंकडून सातारा जिल्ह्याचा आढावा
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
प्रहार जनशक्ती पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी मनोज माळी यांची निवड करण्यात आली. प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते मनोज माळी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. तसेच निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
मनोज माळी यांनी केवळ प्रहार जनशक्ती पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून केलेले सामाजीक कार्य व विविध सामाजीक प्रश्नांसाठी केलेल्या आंदोलनांची दखल घेऊन आमदार बच्चू कडू यांनी मनोज माळी यांना प्रहारच्या जिल्हाअध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने आमदार बच्चू कडू यांनी सातारा जिल्ह्याचा आढावा घेताला. तसेच विधानसभेपुर्वी सातारा जिल्ह्यातील प्रहार संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना आमदार बच्चू कडू यांनी केल्याच्या मनोज माळी यांनी सांगीतले.
आमदार बाच्चूभाऊंनी प्रहारच्या जिल्हाअध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याने सामाजीक चळवळीला अधिक बळ मिळेल. यापुढे जिल्ह्यातील शेतकरी, युवक, कामगार , पीडित, गोरगरीबांचे व दिव्यांग यांचे प्रश्न अधिक ताकतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनोज माळी यांनी सांगीतले. यावेळी, प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, स्वीय सहाय्यक गौरव जाधव, पाटण तालुका अध्यक्ष शुभम उबाळे, जिल्हा सचिव शिवाजी चव्हाण, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष भानुदास डाईंगडे, बंटी मोरे, जयदीप आचार्य, प्रितेश माने व कार्यकर्ते उपस्थित होते.