व्यवसाय

श्री कालिकादेवी पतसंस्थेतर्फे १५ टक्के विक्रमी लाभांश जाहीर संस्थेचे अध्यक्ष : राजन वसंतराव वेळापुरे

श्री कालिकादेवी पतसंस्थेतर्फे १५ टक्के विक्रमी लाभांश जाहीर संस्थेचे अध्यक्ष राजन वसंतराव वेळापुरे यांची माहिती ; संस्थेचा २७७ कोटींचा एकत्रीत व्यवसाय
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड या संस्थेच्या विद्यमान सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मा. चेअरमन साहेब राजन वसंतराव वेळापुरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेला या वर्षात रु.२ कोटी ७५ लाख ५८ हजारचा ३९५, पैसे ७६ एवढा निव्वळ नफा झाला असुन सभासदांना १५% विक्रमी लाभांश जाहीर करुन सदरचा लाभांश सभासदांच्या सेव्हिंग्ज ठेव खात्यावर जमा होत असल्याचे सांगितले.
सभेच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री कालिका कुटुंब जनक स्व. गजानन
(बाळासाहेब) बंडोबा मोहिरे व संस्थेचे देवाज्ञा झालेले सभासद यांना भावपूर्ण श्रद्धांजली संस्थेचे संचालक, सभासद, मोहिरे कुटुंबीयांचे नातेवाईक यांनी अर्पण केली. संस्थेच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीमध्ये स्व. गजानन (बाळासाहेब) बंडोबा मोहिरे यांचे मोठे योगदान आहे असे संस्थेचे संस्थापक मुनीर बागवान सावकार यांनी सांगितले.
संस्थेने ३ तपांची समृद्ध विकासाची अर्थपूर्ण वाटचाल संस्थेचे कुटुंब प्रमुख मुनीर बागवान सावकार व संस्थेचे कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली २७७ कोटींचा एकत्रित व्यवसायाचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करून सभासदांच्या हितासाठी अनेक नविन सोयी, सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
सभासदांच्या स्वमालकीच्या कराड व सातारा येथील स्ववास्तुत सभासदाच्या सोयीसाठी सी.बी.एस संगणक प्रणाली सुरु केली आहे. सभासदांना याद्वारे एस.एम.एस बँकिंगची सुविधा, आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी, ऑनलाईन स्टॅम्प ड्युटी, जीएसटी चलने, लॉकर अशा विविध सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. देशातील सहकार मजबुत करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील सहकार विद्यापीठ स्थापन्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारधीन आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक उन्नती मध्ये सहकार क्षेत्राचा फार मोठा वाटा आहे. सहकारातील फायदा हा सभासदांचा असतो हे सहकाराचे वेगळेपण आहे. सभेत सर्व ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आले.
सभेस उपाध्यक्ष अनिल सोनवणे, संचालक अरुण जाधव, प्रा. अशोक चव्हाण, डॉ. संतोष मोहिरे, डॉ. जयवंत सातपुते, शरदचंद्र देसाई, राजेद्रकुमार यादव, सुरेश भंडारी, निरंजन मोहिरे, श्रीमती जयाराणी जाधव, सौ. सीमा विभुते, तज्ञ संचालक सुरेश कोळेकर तसेच सातारा शाखा सल्लागार औदुंबर कासार, मारुती सावंत, सी.ए. शिरीष गोडबोले, संस्थापक संजय मोहिरे व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »