भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा गुरुवारी कराडच्या दौऱ्यावर विंग येथे भव्य जनसंवाद मेळावा, भाजपा करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा गुरुवारी कराडच्या दौऱ्यावर
विंग येथे भव्य जनसंवाद मेळावा, भाजपा करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
कराड : ग्राम दौलत नेटवर्क –
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री ना. जे. पी. नड्डा गुरुवारी (ता. २२) कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दुपारी ३ वाजता विंग (ता. कराड) येथील आदर्श विद्यामंदिरच्या पटांगणावर भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी ना. जे. पी. नड्डा यांच्यासमवेत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर मंत्री उपस्थित राहणार असून, या मेळाव्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे.
कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री ना. नड्डा गुरुवारी (ता. २२) कराड दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमानंतर भाजपा कराड दक्षिणच्यावतीने विंग येथे दुपारी ३ वाजता भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभुराज देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे हे मान्यवर मंत्री प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार आनंदराव पाटील, दिलीपराव येळगावकर, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश सचिव भरत पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर विधानसभेचे निवडणुक प्रमुख मनोज घोरपडे यांच्यासह पक्षाच्या विविध मोर्चांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या भव्य मेळाव्याला कराड दक्षिणमधील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांनी केले आहे.