आटके येथे मोफत रक्त तपासणी व आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद आटके ग्रामपंचायत व काळे पॅथॉलॉजीचा उपक्रम
आटके येथे मोफत रक्त तपासणी व आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद आटके ग्रामपंचायत व काळे पॅथॉलॉजीचा उपक्रम
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
आटके ग्रामपंचायत, प्रतिसाद सामाजिक व शैक्षणिक संस्था, मलकापूर संचलित काळे पॅथॉलॉजी लॅबोरेटरी कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आटके (ता. कराड) येथे मराठी शाळा, अंगणवाडी व हायस्कूलचे विद्यार्थी तसेच महिलांची रक्त तपासणी मोहीम तीन टप्प्यांमध्ये १५ व्या वित्त आयोगामार्फत पार पडले. यामध्ये काळे लॅबोरेटरी कराड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये गावातील महिलांची थायरॉईडची तसेच रक्तामधील रक्ताचे प्रमाण, प्लेटलेट्स, पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी इत्यादींची तपासणी करण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक शाळा यामध्ये मुलींची व मुलांची रक्तातील हिमोग्लोबिन, पांढऱ्या पेशी, लाल पेशी, प्लेटलेट इत्यादींची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण गावातील ३५० महिला तसेच २०० मुला-मुलींचे रक्ताचे नमुने घेऊन ते लॅबोरेटरीमध्ये तपासण्यात आले. या शिबीरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अतिशय चांगल्या पद्धतीने व नेटक्या नियोजनातून हे शिबीर यशस्वीरित्या पार पडले.
कार्यक्रमास डॉ. कागदी मॅडम वैद्यकीय अधिकारी काले, आटके गावच्या सरपंच सौ. रोहिणी पाटील, उपसरपंच डॉ. बी. जे. काळे उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामविस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले.
यामध्ये काळे लॅबोरेटरीचे संचालक डॉ. दीपक काळे, त्यांच्या पत्नी सौ. कल्पना काळे, लॅबोरेटरीचे मेडिकल डायरेक्टर डॉ.एम. बी. पवार, लॅबोरेटरीचा स्टाफ भारती गरुड, सौ. वैशाली नायकवडी, सौ. प्रियंका जावीर तसेच इतर टेक्निशियन यांच्या उपस्थितीत रक्त संकलन व तपासणी करण्यात आले. या शिबीरासाठी ग्रामपंचायतीचे मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रोहिणी पाटील, उपसरपंच डॉ. बी.जे. काळे, ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गायकवाड तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सुनिता दुपटे, वर्षा खैरमोडे, शीतल पाटील, सुरेश पाटील, जयश्री पाटील, रमेश जाधव, सुरेश पाटील, अविनाश पाटील, सुरेश सर्जेराव पाटील, शोभा दुपटे, प्रतीक पाटील, मनीषा तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक अरविंद पाटील, गजेंद्र पाटील, , प्रकाशबापू पाटील, अजित पाटील, काकासो जाधव, पोलीस पाटील जयवंत काळे, राजेश जाधव, आरोग्य सेविका जे. पी. पाटील, आशा सुपरवायझर विद्या पाटील, रत्नप्रभा काळे, रोहिणी काळे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन पाटील, सचिन जाधव, लालासो काळे यांचे मोलाचे सहकार्य या लाभले. यावेळी काळे लॅबोरेटरीचे संचालक डॉ. दीपक काळे यांनी प्रास्ताविकमध्ये सांगितले की, महिलांना सध्या जास्त उद्भवणारा आजार म्हणजे थायरॉईड हा आहे. थायरॉईड हा आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो त्यामुळे त्याचे वेळीच निदान झाले नाही तर त्याचे शरीरावरती दुष्परिणाम दिसून येतात याचे उदाहरण म्हणजे शरीरातील हार्मोनल इम्बॅलन्स होतो. त्यामुळे अचानक वजन वाढणे, वजन कमी होणे, आवाजामध्ये बदल होणे, गळ्याच्या भोवती सूज येणे, मासिक पाळीमध्ये त्रास होणे, केस गळणे, हृदयाची धडधड वाढणे, अशी लक्षणे दिसून येतात. यामध्ये वेळीच निदान झाले तर पुढचे दुष्परिणाम टाळता येतात. त्यामुळे महिलांमध्ये थायरॉईडची तपासणी करणे या काळात फार गरजेचे आहे. ही तपासणी तशी पाहिली तर फार खर्चिक आहे. याचा विचार करून गावातील सर्व महिलांसाठी ही तपासणी पूर्णपणे मोफत करून दिली आहे.
लॅबोरेटरीच्या संचालिका सौ. कल्पना काळे यांनी महिलांचे एकंदरीत आरोग्य कसे चांगले ठेवायचे याबद्दल मार्गदर्शन केले. शरीरामध्ये रक्ताची कमतरता कशी भरून काढायची व लोह याचे प्रमाण कसे वाढवायचे आणि कोणते खानपान केल्यानंतर त्याची वाढ होण्यास मदत होणार आहे याचे मार्गदर्शन केले.
काले ग्रामीण आरोग्य अधिकारी कागदी मॅडम यांनीही महिलांनी गर्भधारणेमध्ये स्वतःची काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच गावासाठी औषधे उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी मान्य केले. ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले व इथून पुढेगावामध्ये अशा पद्धतीचे आरोग्य शिबीरे कायम घेण्यात येतील असे आश्वासन दिले.