डॉ.अतुल भोसलेंच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांची रानातील वाट होणार सुकर कराड दक्षिणमधील २२७ कि.मी. पाणंद रस्त्यांचे होणार मजबुतीकरण; ४५ कोटींचा निधी मंजूर
डॉ.अतुल भोसलेंच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांची रानातील वाट होणार सुकर
कराड दक्षिणमधील २२७ कि.मी. पाणंद रस्त्यांचे होणार मजबुतीकरण; ४५ कोटींचा निधी मंजूर
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराड दक्षिण मतदारसंघातील ६४ गावांमधील सुमारे २२७ किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणास महायुती शासनाने मंजुरी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकारामुळे या २२७ किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांच्या खडीकरणासाठी सुमारे ४५ कोटींचा निधी मंजूर झाला असून, यामुळे शेतकऱ्यांची रानातील वाट सुकर होणार आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल बाहेर काढण्यासाठी पाणंद रस्ते उपयोगी पडतात. पण कराड दक्षिणमधील अनेक गावांमधील पाणंद रस्त्यांने दीर्घकाळापासून मजबुतीकरण न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषत: सुगीच्या दिवसांत कृषी माल बाहेर काढून बाजारात पोहचविणे, शेतीअवजारे शेतापर्यंत पोहचविणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे या पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी विविध गावांमधील शेतकरी व ग्रामस्थांनी डॉ. अतुल भोसले यांच्याकडे केली होती. त्यानुसार डॉ. भोसले यांनी कराड दक्षिणमधील विविध गावांमधील पाणंद रस्त्यांसाठी राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेतपाणंद रस्ता योजनेंतर्गत निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या नियोजन विभागाने कराड दक्षिणमधील ६४ गावांमधील सुमारे २२७ किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणास मंजुरी देत, रस्त्यांच्या खडीकरणासाठी सुमारे ४५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांची रानातील वाट सुकर होणार आहे.
यामध्ये रेठरे बुद्रुक (६ किमी), कार्वे (५ किमी), मुंढे (४ किमी), विंग (६ किमी), कुसुर (८ किमी), गणेशवाडी (३ किमी), आणे (६ किमी), चचेगाव (३ किमी), वारुंजी (४ किमी), दुशेरे (७ किमी), तुळसण (४ किमी), घारेवाडी (७ किमी), विठोबाचीवाडी (३ किमी), धोंडेवाडी (९ किमी), ओंड (२ किमी), बामनवाडी (१ किमी), तारुख (५ किमी), येरवळे (१ किमी), येणके (२ किमी), वाठार (४ किमी), शेळकेवाडी – म्हासोली (२ किमी), कासारशिरंबे (१२ किमी), बेलवडे बुद्रुक (२ किमी), खोडशी (१ किमी), कोडोली (३ किमी), कापील (२ किमी), येवती (१ किमी), येळगाव (३ किमी), नांदलापूर (३ किमी), कालेटेक (२ किमी), मालखेड (७ किमी), रेठरे खुर्द (२ किमी), वडगाव हवेली (६ किमी), आटके (५ किमी), साळशिरंबे (२ किमी), टाळगाव (१ किमी), गोटेवाडी (२ किमी), घोगाव (२ किमी), म्हासोली (१ किमी), नांदगाव (८ किमी), शेणोली (५ किमी), गोंदी (५ किमी), खुबी (६ किमी), शेरे (५ किमी), कालवडे (४ किमी), जुळेवाडी (२ किमी), काले (८ किमी), गोळेश्वर (१ किमी), भरेवाडी (१ किमी), गोटे (३ किमी), चौगलेमळा (१ किमी), जुजारवाडी (४ किमी), सवादे (१ किमी), मनव (१ किमी), पोतले (३ किमी), ओंडोशी (१ किमी), अंबवडे (१ किमी), अकाईचीवाडी (१ किमी), जखिणवाडी (५ किमी), जिंती (२ किमी), कोळे (५ किमी), येणपे (२ किमी), किरपे (१ किमी), कोळेवाडी (१ किमी) अशा एकूण ६४ गावांमधील एकूण २२७ लांबीच्या पाणंद रस्त्यांचे खडीकरण केले जाणार आहे. यासाठी शासनाने ४५ कोटींचा निधी मंजूर केला असून, लवकरच खडीकरणाचे काम मार्गी लागणार आहे. या निधीबद्दल डॉ. अतुल भोसले यांचे व महायुती सरकारचे सर्वस्तरातून आभार मानले जात आहेत.