अंतवडी येथे 26 जुलै कारगिल विजय दिवस केला साजरा शहीद वीर जवान महादेव निकम यांना केले अभिवादन
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
१९९९ मध्ये ०३ मे ते २६ जुलै भारतीय सैन्याने पाकिस्तान सेनेविरुद्ध कारगिल युध्दात विजय मिळवुन अशक्य ते शक्य करुन दाखविले. या युध्दात भारतीय सैनिकांचा दृढनिश्चय आणि पराक्रम जागोजागी दिसुन आला. त्यामुळे तोलोलींग , टायगर हिल इत्यादी पाकिस्तानने कब्जा केलेली ठाणी भारतीय सैन्याने जिंकली. दि. २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानी सैनिकांनी कब्जा केलेले शेवटचे ठाणे भारतीय सैन्याने जिंकुन भारतीय सीमा अतिक्रमण मुक्त केली तो दिवस कारगिल विजय दिवस म्हणुन साजरा केला जातो. आज या कारगिल युद्धाला 25 वर्षे पूर्ण होत असून त्याचे रोप्य महोत्सवी वर्ष 26 जुलै कारगिल विजय दिवस देशांमध्ये सर्व ठिकाणी शहीद वीर जवानांना अभिवादन करून साजरे केले जात आहे.अंतवडी गावचे सुपुत्र शहीद वीर जवान महादेव यशवंत निकम यांच्या स्मारकास प्रशासनाचे वतीने कराड तालुक्याचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. व वीर पिता श्री यशवंत निकम यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सैनिक फेडरेशन जिल्हा अध्यक्ष प्रशांत कदम, कर्नल महादेव कटेकर ,माजी सैनिक (नि.)सुबेदार राजाराम माळी, दिंकर जाधव,संतोष यादव,रमेश जाधव,भीमराव सावंत,हूनमंत शिरतोडे, हनुमंत चव्हाण, समाजीक कार्यकर्ते प्रवीण शिंदे,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री बर्गे साहेब, तलाठी ,सर्कल,अंतवडी गावचे सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच,सर्व सदस्य, माजी सैनिक संघटना अंतवडी, एन.सी.सी
कॅडेट ग्रामस्थ, महीला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.