शेतकरी कामगार पक्ष राज्यव्यापी अधिवेशन 2 व 3 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे होणार
शेतकरी कामगार पक्ष राज्यव्यापी अधिवेशन येत्या 2 व 3 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे होणार
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
शेतकरी कामगार पक्ष राज्यव्यापी अधिवेशन येत्या 2 व 3 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे होणार आहे. त्या संदर्भात पाच जिल्ह्यांची सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे यांची विभागीय मेळावा आज कोल्हापूर येथे पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी रूपरेषा व मार्गदर्शन केले. यावेळी भाई उमाकांत राठोड यांनी पक्षाचा अजेंडा व अधिवेशन संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत असताना अड.भाई समीर देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राध्यापक भाई लगारे सर यांनी केले.आभार प्रदर्शन भाई बाबासाहेब देवकर यांनी केले. याप्रसंगी पाच जिल्ह्यातून बहुसंख्य शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.