लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पुतळ्याचा सोमवारी अनावरण समारंभ आ. भाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती; कोयना बँकेच्या कराड प्रशासकीय कार्यालयाचेही उद्घाटन
लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पुतळ्याचा सोमवारी अनावरण समारंभ
आ. भाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती; कोयना बँकेच्या कराड प्रशासकीय कार्यालयाचेही उद्घाटन
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
येथील कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोयना सहकारी बँकेचे भव्य प्रशासकीय कार्यालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवेशद्वारावरच माजी मंत्री लोकनेते स्व. लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा साकारण्यात आला असून त्याचा अनावरण समारंभ सोमवार, दि. 15 रोजी दुपारी 2 वाजता भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आ. भाई जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच यावेळी कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण असणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सामाजिक न्याय मंत्री, माजी खा. जयवंतराव आवळे, सांगलीचे खा. विशाल पाटील, माजी गृह, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य राज्यमंत्री आ. सतेज उर्फ बंटी पाटील, माजी सहकार, कृषी राज्य मंत्री आ. विश्वजीत कदम, आ. संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तरी बँकेच्या सर्व सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
अॅड. उदयसिंह पाटील यांनी केले आहे.