सिध्देश्वर विकास सोसायटी चेअरमनपदी शिवाजी चव्हाण तर व्हा.चेअरमनपदी महादेव इंगवले यांची निवड
सिध्देश्वर विकास सोसायटी चेअरमनपदी शिवाजी चव्हाण तर व्हा.चेअरमनपदी महादेव इंगवले यांची निवड
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
सिद्धेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड कोपर्डे हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे आज झालेल्या निवडीमध्ये सिध्देश्वर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून श्री शिवाजी अधिकराव चव्हाण यांची चेअरमन म्हणून निवड करण्यात आली तसेच महादेव सदाशिव इंगवले यांची व्हाईस चेअरमन म्हणून एकमताने निवड करण्यात आली या निवडीसाठी अध्यासीअधिकारी म्हणून सौ भागवत उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय कराड तसेच सातारा जिल्हा पतसंस्था संचालक मा.संपतराव शिंदे साहेब तसेच संस्थेचे माजी चेअरमन शैलेश चव्हाण माजी चेअरमन दादासाहेब चव्हाण मा.चेअरमन प्रल्हाद चव्हाण मा व्हाईस चेअरमन बाळासाहेब चव्हाण तसेच संचालक मंडळामध्ये सुभाष रामचंद्र चव्हाण डी एस काशीद जगन्नाथ पडळकर राजेंद्र जयसिंग चव्हाण माजी चेअरमन शरद पाटील संपतराव सरगडे हौसाबाई दिलीप चव्हाण मंदाकिनी कृष्णत तुपे जयसिंग खाशाबा चव्हाण अनिल भास्कर चव्हाण उपस्थित होते सचिव गणेश घाडगे क्लार्क प्रकाश साळवे उपस्थित होते.