छत्रपती शाहू महाराजांनी समाज क्रांतीचा झेंडा शेवटपर्यंत हाती घेतला : ॲड.संभाजीराव मोहिते
छत्रपती शाहू महाराजांनी समाज क्रांतीचा झेंडा शेवटपर्यंत हाती घेतला : ॲड. संभाजीराव मोहिते
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
जातीयतेचा अंत करण्यासाठी शाहू महाराजांचे योगदान मोठे आहे त्यांनी समाज क्रांतीचा झेंडा शेवटपर्यंत हाती घेतला शाहू महाराज कर्तुत्व संपन्न राजा होते असे प्रतिपादन शाहू चरित्र अभ्यासक ॲड. संभाजीराव मोहिते यांनी केले.
आप्पासाहेब कळके (कदम) प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राजश्री शाहू महाराजांची 150 वी जयंती निमित्त ठेवण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील (नाना), इंद्रजीत चव्हाण, सौरभ पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब कळके (कदम) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ॲड.संभाजीराव मोहिते पुढे म्हणाले, शाहू महाराजांचे काम जगविख्यात असून त्यांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे. राजा हा शासक असतो, पण शाहू महाराजांनी प्रजेच्या कल्याणासाठी पालक म्हणून जीवनभर कार्य केले. राजश्री शाहू महाराजांना थोडाफार कारभार पाहता आला पण अल्पकाळातही त्यांनी समाजकल्याण्यासाठी बहुमोल योगदान दिले. त्या काळात आंतरजातीय विवाह, विधवा, पुनर्विवाह, घटस्फोटांचा कायदा आदी क्रांतिकारी कायदे करून स्त्रियांचे सक्षमीकरण केले.
यावेळी माननीय खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब कळके (कदम) यांनी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती देऊन गेली पन्नास वर्षे म्हणजे 1977 सालापासून शाहू महाराजांची जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तर उपस्थितांचे स्वागत किरण पाटील यांनी केले. तर आभार निखिल ठोंबरे यांनी मानले.
कार्यक्रमास मुख्याधिकारी खंदारे, तहसीलदार विजय पवार, निखिल ठोंबरे, रोहन विभुते, दिलीप घारे, विनायक चावडीमणी, मुकुंद चरेगावकर, आजी माजी नगरसेवक, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.