राज्याचे बजेट महिलांसाठी क्रांतिकारक माजी आ. आनंदराव पाटील; राज्य सरकारचे केले अभिनंदन
राज्याचे बजेट महिलांसाठी क्रांतिकारक माजी आ. आनंदराव पाटील; राज्य सरकारचे केले अभिनंदन
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
शुक्रवारी झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नवीन सादर केलेले बजेट महिलांसाठी क्रांतीकारक निर्णय असल्याचे मत माजी आमदार आनंदराव पाटील यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री त्याचा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सादर केलेल्या बजेटवर माजी आ. आनंदराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
श्री. पाटील म्हणाले, प्रत्येक 21 वर्षांवरील मुलींना 1500 रुपये व राज्यातील सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बेरोजगार पदवीधर युवक, युवतींना 10 हजार रुपये देण्याचा अभिनंदन निर्णयही या राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे महिलांचा विकास होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्रात राबविला आहे. राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या ठोस निर्णयाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचा माजी उपाध्यक्ष या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथर शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे श्री. आनंदराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.