शिवनेरी शुगर्सच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आदिराज पाटील (उंडाळकर) यांचा कोयना बँकेतर्फे सत्कार
शिवनेरी शुगर्सच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आदिराज पाटील (उंडाळकर) यांचा कोयना बँकेतर्फे सत्कार
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
जयपूर, ता.कोरेगाव येथील शिवनेरी शुगर्सच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आदिराज पाटील (उंडाळकर) यांचा कोयना सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना आदिराज पाटील-उंडाळकर म्हणाले, कोयना बँकेने केलेल्या सत्काराचा मी ऋणी राहीन. स्व. विलासकाका पाटील यांनी गत ५० वर्षापासून कराड दक्षिणच्या डोंगरी भागातील जनतेला मुलभूत सोई सुविधा पुरविण्याचे काम अखंडपणे केले. दक्षिणेतील जनतेचे जीवनमान उंचावून गावागावात विकास कामांचे पर्व उभारले आहे. त्यांचे समाजसेवेचे व्रत आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून यापुढे मी कार्यरत राहीन. स्वातंत्र्य संग्रामाची पार्श्वभूमी असणाऱ्या उंडाळकर घराण्याला साजेसे असे काम करून सर्वसामान्य जनतेशी नाळ अधिक घट्ट करण्याचे काम करणार असल्याचे यावेळी आदिराज उंडाळकर यांनी सांगितले.
कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष विजय मुठेकर यांनी आभार मानले. सत्कार समारंभास बँकेचे सर्व संचालक, सेवक वर्ग उपस्थित होते.