सकल हिंदू समाजातर्फे कराडमध्ये महामार्ग रोको
सकल हिंदू समाजातर्फे कराडमध्ये महामार्ग रोको
शिवरायांच्या पुतळा विटंबन प्रकरणाचे पडसाद; प्रशासनास निवेदन, संबंधिताच्या कारावासाची मागणी
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
हडपसर (पुणे) येथे अज्ञाताकडून सकल हिंदु समाजाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर झालेल्या दगडफेकीमुळे सकल हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या संतापजनक कृत्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी कराड येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करून निषेध नोंदवण्यात आला.
प्रारंभी, शहरातील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकवटलेल्या सकल हिंदू समाजाच्या वतीने महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संतप्त समाजबांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करत संबंधितास दहा वर्षांचा सश्रम कारावास करण्याची मागणी केली. तसेच दत्त चौकातून कोल्हापूर नाक्यापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये कराड व मलकापूर शहरासह तालुक्यातील विविध गावांतील हिंदु समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.