शाहू महाराजांनी महाराष्ट्राला समतेचा विचार दिला
आ.बाळासाहेब पाटील; कराडमध्ये 150 व्या जयंतीनिमीत्त केले अभिवादन
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्राला समतेचा विचार दिला. सर्व जाती-धर्माला, समाजाला बरोबर घेऊन जाण्याची त्यांची भूमिका होती. आदर्श राजे म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या विचारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने राज्याच्या कारभाराची घौडदौड सुरू राहणे अपेक्षित आहे, असे मत आ.बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमीत्त कराड येथील शाहू चौकातील त्यांच्या पुतळ्यास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ.बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी खा. श्रीनिवास पाटील, माजी आ. आनंदराव पाटील, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, बाबासाहेब कळके, प्रशांत यादव, ॲड. संभाजीराव मोहिते, बाळासाहेब यादव, सुहास पवार, राकेश शहा, जयंत बेडेकर, ॲड. प्रताप पाटील, राजेंद्र कांबळे, महादेव पवार, भारत थोरवडे, सतीश भोंगाळे, सोहेब सुतार, अजय सुर्यवंशी, भानुदास वास्के, किरण पाटील व नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थिताचे स्वागत बाबासाहेब कळके यांनी केले.