गाव सोडण्याची तयारी असणाऱ्यांना रोजगाराच्या मुबलक संधी : हणमंतराव गायकवाड
गाव सोडण्याची तयारी असणाऱ्यांना रोजगाराच्या मुबलक संधी
न्यूज लाईनच्या कार्यास बीव्हीजी ग्रुपची सदैव साथ : हणमंतराव गायकवाड
दिमाखदार न्यूज लाईन सोहळ्याने उपस्थित भारावले
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
नजीकच्या काळात भारतीय तरुणांना जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये रोजगाराच्या कोट्यावधी संधी उपलब्ध असून तरुणांनी परंपरागत शिक्षणाला फाटा देऊन कौशल्य विकासावर भर द्यावा. याचबरोबर विकसित देशांच्या भाषा शिकण्याची गरज असून तरुणांनी गाव सोडण्याची तयारी ठेवावी असे सांगून ते म्हणाले न्यूज लाईनची गौरवशाली परंपरा उदात्त हेतूने कार्य करत राहणाऱ्यांसाठी स्फूतदायक आहे. न्यूज लाईनच्या समाजाभिमुख भूमिकेला बीव्हीजी ग्रुपचे सदैव सहकार्य राहिल असे आश्वासनही बीव्हीजी ग्रुपचे संचालक हणमंतराव गायकवाड यांनी दिले.
येथील कराड अर्बन शताब्दी सभागृहात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती, संस्थांना पुरस्कार देऊन गौरविणारा न्यूज लाईन सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या महनीय व्यक्ती, संस्थांचा प्रमुख पाहुणे जगविख्यात मराठी उद्योजक हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. सुभाषराव एरम, न्यूज लाईनचे संपादक प्रमोद तोडकर, संचालक सागर बर्गे, सहसंपादक अमोल टकले, कार्यकारी संपादक सुहास कांबळे, नारी स्पंदनच्या कल्पना जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सन्मान सोहळ्यामध्ये कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांचा उद्योग महष पुरस्काराने तर डॉ. सुभाषराव एरम यांचा धन्वंतरी भूषण, साहेबराव शेवाळेे यांचा उद्योजक शिल्पकार, सलीम मुजावर यांचा आदर्श समाजसेवक, विजय काळे यांचा प्रयोगशील शेतकरी, सुनिल ऐवळे यांचा सूर-वीर कलारत्न, श्रीमती मदिना मुलाणी यांचा संस्कार-दीप, धनंजय बोरकर यांचा साहित्यरत्न, परेशकुमार कांबळे यांचा मानवतेचा दीपस्तंभ, अमोल पालेकर यांचा कुशल प्रशिक्षक पुरस्काराने तर कुमारी सानिका नलवडे हिला क्रीडरत्न पुरस्कार तर गड संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान या संस्थेचाही प्रेरणादायी संस्था पुरस्काराने गौरव करण्यात आला.
गायकवाड म्हणाले, भारतामध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. तर इतर देशांमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मात्र आपल्या पारंपारिक शिक्षण पध्दतीमुळे युवकांना रोजगार मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. यासाठी अन्य देशांच्या भाषा अवगत करण्याबरोबर स्वतःतील कौशल्य वाढवण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात जपान, जर्मन या देशांमध्ये दरवष दोन लाख भारतीय तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहे. याचा विचार करून छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी व इंग्रजांची स्थलांतराची तयारी भारतीय तरूणांनीही स्विकारण्याची गरज आहे. तसेच आपल्या उत्कर्षाबरोबर समाजातील उपेक्षित गरजूला देखील मदतीची भावना जपण्याचे उपस्थितांना त्यांनी आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना सुभाषराव जोशी म्हणाले, अवघ्या वीस-पंचवीस वर्षामध्ये हणमंतराव गायकवाड यांनी उद्योग जगतात मिळवलेले स्थान हे सर्वांसाठी प्रेरणा आणि स्फूर्ती देणारे आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली तरी देखील ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय कर्तव्य ठरेल. न्यूज लाईनच्या सन्मान सोहळ्यातून पुढील काळात देखील अधिकचे काम करण्याचे बळ व उर्जा मिळाली.
संपादक प्रमोद तोडकर म्हणाले, गुणवंतांची, यशवंतांची योग्य दखल घेण्यामुळे समाजामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. याच भूमिकेतून गेली चार वर्षे न्यूज लाईन समुहाची वाटचाल सुरू आहे. सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून कितवंत, प्रेरणादायी, समाजाला मार्गदर्शक ठरणारे व्यक्तीमत्वांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे हाही उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आम्ही कार्यरत आहोत. दिवसेंदिवस याचे स्वरूप वाढत चालले असून समाजाचे सहकार्य लाभत आहे.
कार्यक्रमास बँकेचे संचालक महादेव शिंदे, महिपती ठोके, राजेश खराटे, अर्बन बँकेचे सीईओ सीए दिलीप गुरव, उपाध्यक्ष समीर जोशी, अतुल शिंदे, संदीप पवार, सुहास पवार, शिवराज मोरे, अशोकराव पाटील, फारूक पटवेकर, रणजीत पाटील, हणमंतराव पवार, राजेंद्र माने, प्रा. सतीश उपळावीकर, प्रमोद पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक तडाखे यांनी केले. मानपत्र वाचन हिंदवी तोडकर, अंजली तोडकर यांनी केले. कार्यकारी संचालक सागर बर्गे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत लाड, राहुल पुरोहित, काकासाहेब शेवाळे, मनोज माने, दिनेश पोरवाल, न्यूज लाईन सन्मान सोहळा समिती व आदींचे सहकार्य लाभले.