कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे 42 विद्यार्थ्यांपैकी 29 विद्यार्थी 80% च्या वरती गुण मिळवून यशस्वी
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे 42 विद्यार्थ्यांपैकी 29 विद्यार्थी 80% च्या वरती गुण मिळवून यशस्वी
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
महाराष्ट्र राज्य बोर्डातर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समधील इयत्ता दहावी 2024 चा निकाल शंभर टक्के लागला असून, सलग चार वर्षे 100% निकालाची यशस्वी परंपरा कायम राखण्यात आली. प्रथम पाच विद्यार्थ्यांमध्ये कु. रिया निलेश थोरात 95.60%. कु. वेदांतिका अशोक काकडे-94-80%. कु. सिध्दी शंकर रामुगडे 93.00% कु. अपूर्व उमेश चव्हाण -91.00% कु. गीतांजली मधुकर लावंड 90. 60% गुण मिळवून यशस्वी झाली आहेत. एकूण 42 विदयार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 38 विदयार्थी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. व चार विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास मिळाला आहे. गणित या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण कु. रिया निलेश थोरात हीने मिळवले, सायन्स या विषयामध्ये 100 पैकी 97 गुण कु. रीया निलेश थोरात व कु. वेदांतिका अशोक काकडे यांनी मिळवले. इतिहास नागरिक शास्त्र या विषयामध्ये 100 पैकी 97 गुण कु. रीया निलेश थोरात, कु. सुजल उमेश पाटील, कु. श्रुती शैलेश थोरात यांनी मिळवले. हिंदी या विषयात 100 पैकी 94गुण कु. रीया निलेश थोरात, कु सिद्धी शंकर रामुगडे. यांनी मिळवले. इंग्रजी विषयात 100 पैकी 94 गुण कु. वेदांतिका अशोक काकडे, मराठी विषयात 100 पैकी 93 गुण कु. वेदांतिका अशोक काकडे हीने मिळवले आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स व कोटा अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. महेश खुस्पे, उपाध्यक्षा सौ. मंजिरी खुस्पे, संचालिका मैथिली खुस्पे, प्राचार्या सौ. जयश्री पवार, उपप्राचार्य सौ. सना संदे सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळेस पालकांच्या मनोगतामध्ये श्री. निलेश थोरात, श्री. सचिन पाटील, श्री. सतीश मोरे, श्री. शंकर रामुगडे, श्री. राहुल खडके, श्री. शैलेश थोरात, सौ. मनीषा काकडे या पालकांनी मनोगत व्यक्त केले व कोटा ज्युनिअर कॉ कॉलेज ऑफ सायन्सचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये संस्थेच्या संस्थापकांचे मोलाचा वाट आहे त्यामुळे मुलांना उत्तुंग यश संपादन केले असे मनोगत व्यक्त केले. कु. गीतांजली लावंड, कु. सिद्धी रामुगडे, कु. रिया थोरात, कु. संस्कृती देशमुख, कु. देवयानी मोरे, कु. वरूण जाधव, कु. सुजल कुलकर्णी, कु. नील पाटील, या विद्यार्थ्यांनी देखील मनोगत व्यक्त करून सर्व शिक्षक, संस्थापक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे आभार मानले व आजचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विदयार्थ्यांनी कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या संस्थापकांचे, शिक्षकांचे आभार मानले विद्यार्थीच्या सर्वांगिण व्याकीमत्वाचा विकास घडवण्यासाठी कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा खुप मोठ योगदान आहे. असे मनोगत पालकांनी व्यक्त केले.
शैक्षणिक क्षेत्रातील उज्जवल परंपरा असलेल्या कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सने यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.