डॉ.अतुलबाबा भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.गौरवी भोसले यांनी मतदानाचा हक्क बजाविला
डॉ.अतुलबाबा भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.गौरवी भोसले यांनी मतदानाचा हक्क बजाविला
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. गौरवी भोसले यांनी रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील पवारमळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला. तसेच य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व श्री. विनायक भोसले यांनीही या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला.
यावेळी बोलताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, आजचा दिवस लोकशाहीसाठी महत्वाचा आहे. सर्व नागरिकांनी आपला मताचा पवित्र हक्क अवश्य बजावावा. तुमच्या एका मतातून या देशाला समर्थ सरकार लाभू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनता मोठा देत आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित असून, ते सातारा लोकसभेचे खासदार म्हणून नक्की निवडून येतील, असा मला ठाम विश्वास आहे.