जीवनशैली

कराड दक्षिणेत 65.68, तर उत्तरेत 65.33 टक्के मतदान नागरिकांची सकाळच्या सत्रात मतदानास पसंती; मतदान प्रक्रिया शांततेत, प्रशासनाचे चांगले नियोजन

कराड दक्षिणेत 65.68, तर उत्तरेत 65.33 टक्के मतदान
नागरिकांची सकाळच्या सत्रात मतदानास पसंती; मतदान प्रक्रिया शांततेत, प्रशासनाचे चांगले नियोजन
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज मंगळवार, दि. 7 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ झाला. तालुक्यातील कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत नागरिकांनी मतदान करण्यास मोठी पसंती दिली. तर शहरात सकाळी 9 नंतर नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. 11 वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी नागरिकांनी पसंती दिली. त्यानंतर मात्र मतदान करणारांची संख्या चांगलीच रोढवल्याचे दिसून आले. सायंकाळी 4.30 नंतर पुन्हा मतदाणासाठी गर्दी पाहायला मिळाली. परंतु, एकंदरीत नागरिकांचा मतदान करण्यास काहीसा निरुत्साह दिसून आला. कराड दक्षिणेमध्ये 65.68, तर कराड उत्तरमध्ये 65.33 टक्के, तसेच तालुक्यात एकून 65 टक्के मतदान झाले. दरम्यान, तालुक्यातील आठ ठिकाणी मतदान मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे येथील मतदान मशीन्स बदलण्यात आल्या.
कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील एकूण 652 केंद्रावर आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 5.30 ते 5.45 वाजण्याच्या दरम्यान मतदान केंद्रांवर केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान मशीन ताब्यात घेऊन मतदान केंद्र प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदान मशीनची चाचणी घेतल्यानंतर मतदान प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 2 हजार 580 मतदार असून 313 मतदान केंद्र आहेत. येथील काले, वाठार, रेठरे बुद्रुक, बेलवडे बुद्रुक, कासारशिरंबे, नांदगाव, उंडाळे, जिंती, येणपे, कुसूर, कोळे, विंग, चचेगाव, कार्वे, शेणोली आदी गावांमध्ये सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी नागरिकांनी पसंती दिली. सकाळी 11 वाजेपर्यंत 19 टक्के मतदान झाले होते. यामध्ये जेष्ठ नागरिकांसह महिलांचीही संख्या जास्त असल्याचे दिसून आले. त्यानंतर वाढत्या उन्हामुळे दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी असल्याचे पाहायला मिळाले. तर सायंकाळी 5 नंतर मात्र काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 96 हजार 945 मतदार असून 339 मतदान केंद्र आहेत. येथील टेंभू, ओगलेवाडी, करवडी, मसूर, हेळगाव, शामगाव, अंतवडी, निवडी, कोपर्डे हवेली, वडोली निलेश्वर, तळबीड, इंदोली, पाल आदी गावांमध्येही सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी नागरिकांनी पसंती दिल्याचे दिसून आले. तर सकाळी 11.30 वाजल्यानंतर रोढावलेली गर्दी पुन्हा सायंकाळी 4.30 नंतर पाहायला मिळाली.
तसेच शहरातील शिवाजी हौसिंग सोसायटीतील शिवाजी हायस्कूल आणि विठामाता विद्यालयातील मतदान केंद्रांवर सकाळी 11 वाजेपर्यंत मतदाणासाहती नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर शाळा क्रमांक तीन, नूतन मराठी शाळा, कन्या शाळा, टिळक हायस्कूल, शाळा क्रमांक 7 व 12, कार्वे नाका, वाढीव भाग आणि वाखाण परिसरातील मतदान केंद्रांवरहि सकाळच्या सत्रात मतदानासाठी नागरिकांनी गर्दी लेयाचे दिसून आले. त्यानंतर दुपारचा कालावधी वगळता पुन्हा याठिकाणी मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. कराड दक्षिणमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 46.38 टक्के, तर 5 वाजेपर्यंत 56.99 एवढे मतदान झाले होते. उत्तरेत 3 वाजेपर्यंत 43.45 टक्के, तर 5 वाजेपर्यंत 54.89 टाके मतदान झाले होते. तर सायंकाळी 6 वाजता अंतिम मतदान प्रक्रिया संपेपर्यंत दक्षिणमध्ये 65.68, तर उत्तरमध्ये 65.33 टक्के, तसेच तालुक्यात एकून 65 टक्के मतदान झाले.
दरम्यान, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी काही मतदान केंद्रांना भेटी देऊन केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचनाही केल्या. एकंदरीत, तालुक्यात सर्वच मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे दिसून आले. यावरून एकूणच प्रशासनाने मतदान प्रक्रियेचे चांगले नियोजन केल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »