जीवनशैलीदेशव्यवसाय

लोकसभा निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात कराड तालुक्यात 652 केंद्रावर 3 हजार 964 कर्मचाऱयांची नियुक्ती, 50 टक्के केंद्रांवर सीसीटिव्ही व वेब कॅमेरे

लोकसभा निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात
कराड तालुक्यात 652 केंद्रावर 3 हजार 964 कर्मचाऱयांची नियुक्ती, 50 टक्के केंद्रांवर सीसीटिव्ही व वेब कॅमेरे.
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
लोकसभा निवडणूकीसाठी मंगळवार, दि. 7 रोजी होणाऱ्या कराडच्या निवडणूक विभागाची तयारी आंतिम टप्प्यात आली असून कराड दक्षिण व उत्तर मतदार संघातील एकूण 652 मतदान केंद्रावर 3 हजार 964 कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. जवळपास 50 टक्के मतदान केंद्रावर सिसिटीव्ही व व्हेब कॅमेरे बसवण्यात येत आहेत. तर कराड नगर परिषद शाळा क्रमांक 3 मध्ये निवडाणूक विभागाच्या वतीने अव्दितीय मतदान केंद्र साकारण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा महसूलचे उपजिल्हाअधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने कराड दक्षिण व उत्तर मतदार संघातील निवडणूक विभागाने केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी शुक्रवारी प्रांत कार्यालयात पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अतूल म्हेत्रे, तहसिलदार विजय पवा। निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार युवराज पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. तत्पुर्वी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजीत करण्यात आली होती.
विक्रांत चव्हाण म्हणाले की, मतदार नोंदणी कार्यक्रमात कराडने राज्यात सर्वोत्कृष्ठ काम केले आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मदानादानाची टक्केवारी वाढवून कराड राज्यात आव्वल ठरेल यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. यात राजकीय पक्ष, उमेदवार व नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन विक्रांत चव्हाण यांनी केले. 7 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे. मतदानासाठी 11 तासांची वेळ आहे. त्यामुळे जस्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावतील यासाठी प्रशासनाबरोबरच सर्वांनी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 2 हजार 580 मतदार आहेत. तर 313 मतदान केंद्र आहेत. मतदानासाठी एकूण 1834 कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र पोलिसाची नेमणूक करण्यात आली आहे. तर मतदान केंद्राच्या बाहेर आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यासाठी 1 डिवायएसपी, 1 पोलिस निरीक्षक, 14 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 201 पोलिस कर्मचारी, 112 होमगार्ड, केंद्रीय पोलिस दल 1 तुकडी, राज्य सशस्त्र पोलिस दल 1 तुकडी व सशस्त्र रक्षक 1 तुकडी असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
देश पातळीवर नावलौकीक मिळवलेल्या कराड नगरपरीषद शाळा क्रमांक 3 मध्ये अव्दितीय मतदान केंद्र साकारण्यात येणार आहे. तर 94 सैदापूर व 136 कराड या दान ठिकाणी महिला मतदान केंद्र साकारण्यात येणार आहे. 104 कराड व 177 मलकापूर या ठिकाणी युवा मतदार केंद्र साकारण्यात येणार आहेत. 108 कराड येथे दिव्यांगव्दारा संचलित मतदान केंद्र साकारण्यात येणार आहेत. एकूण 313 पैकी 186 मतदान केंद्रावर सिसिटीव्ही व व्हेब कॅमेरे बसवण्यात येणार आले आहेत.
कराड उत्तर मतदार संघात एकूण 2 लाख 96 हजार 945 मतदार आहेत. तर 339 मतदान केंद्र आहेत. यासाठी एकूण 2 हजार 130 कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. आचार संहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी कराड उत्तर मतदार संघात एकूण 5 भारारी पथके व पाच स्थिर पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून आत्तापर्यंत 33 हजार 500 वाहनांची तपासणी करण्यात आल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »