जनतेने महायुतीच्या विकासपर्वात सहभागी व्हावे उदयनराजे भोसले; सुपने-तांबवेत महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा, मोठे मताधिक्य द्या
जनतेने महायुतीच्या विकासपर्वात सहभागी व्हावे
उदयनराजे भोसले; सुपने-तांबवेत महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा, मोठे मताधिक्य द्या
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
राज्यासह केंद्रात प्रगतीच्या दिशेनेशे वाटचाल करणारे सरकार आहे. आगामी काळामध्ये विकासाच्या बाबतीत महायुतीच्या सरकारशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही, त्यामुळे जनतेने महायुतीच्या विकासपर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
सुपने-तांबवे, ता. कराड भागातील महायुती व घटकपक्षांतील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, भाजपचे प्रदेश सचिव भरत पाटील, सातारा लोकसभा निवडणुकीणुचे संयोजक सुनील काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, विश्वासराव कणसे, लक्ष्मणराव देसाई, हनुमंतराव चव्हाण, प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, सुपने-तांबवे भागातील गावांमध्ये दिवंगत आ. विलासराव पाटील यांनी मोठा विकास केला. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर हा भाग पाटणला जोडला गेला. शंभूराज देसाई यांनी देखील आपले कुशल नेतृत्व पणाला लावून याठिकाणी अत्यावश्यक कामे केली आहेत. या परिसरामध्ये पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकते. अनेक राज्यांच्या अर्थव्यवस्था ह्या केवळ पर्यटनावर अवलंबून आहेत. पर्यटन विकासाच्या अनुषंगाने राज्य, तसेच केंद्रातील मोदी सरकारने पाऊले उचलली आहेत. भविष्यात जनतेच्या साथीची आवश्यकता आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, महायुतीने केलेल्या विकासकामांच्या बळावर आपल्याला लोकसभा, तसेच विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. या परिसरातील कोयनाकाठची गावे महापूराच्या भीतीमुळे कायम त्रासलेली होती. कोयना नदीकाठी संरक्षक भिंत बांधल्याने ही गावे आता सुरक्षित झाली आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये याठिकाणी मी स्वतः उमेदवार आहे, हा विचार करून खासदार उदयनराजे भोसले यांचा आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजय करायचा आहे.
प्रदीप पाटील म्हणाले, स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी ज्यापद्धतीने या भागात काम केले. त्याच पद्धतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील विकासकामे केली आहेत. या परिसरातील जनता उदयनराजेंना चांगले मताधिक्य देणार आहे.