कराड बसस्थानकाची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत अंतीम सर्व्हेक्षण
कराड बसस्थानकाची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी
हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत अंतीम सर्व्हेक्षण
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने येथील एसटी बसस्थानक व आगाराची पाहणी केली. या अभियानांतर्गत असलेल्या निकषांची पुर्तता केल्याने आणि प्रवाशांसाठी बसस्थानकावर लोकसहभागातून सुविधा निर्माण केल्याबद्दल समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीकडून चौथ्या टप्यातील अंतिम सर्व्हेक्षणाचे काम सुरु आहे. त्या समितीचे प्रमुख पुणे विभागाचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल, उपयंत्र अभियंता प्रविण शिंदे, कामगार अधिकारी सचिन भुजबळ, प्रवाशी मित्र प्रशांत पवार या समिती सदस्यांनी बसस्थानकाची पाहणी केली.
यावेळी समितीने बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष, प्रवासी आरक्षण कक्ष, पुरुष व महिला स्वच्छतागृह, चालक-वाहक विश्रांती गृह, आरक्षण खिडकी, पास विभाग, चौकशी खिडकीची, प्रवाशांना माहिती देण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था, एसटीच्या योजनांची माहिती यासह अन्य बाबींची पाहणी केली. आगार व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ, आगार प्रमुख विक्रम हंडे यांनी स्वागत केले.
यावेळी सहाय्यक वाहतूक अधिक्षक सागर पांढरपट्टे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक समिन शेख, वाहतूक निरीक्षक रामा वीर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनिल लटके, आगार लेखाकार प्रकाश भांदिर्गे, वाहतूक नियंत्रक अनिल पाटील, अनिल सावंत, धनाजी थोरात, समीर मुजावर, राहुल कदम, लेखनिक सुरज पाटील, सुरेखा साळुंखे, दिपक महाजन, अमित कोळी, जगन्नाथ शिंदे, प्रमोद पोळ, शुभांगी जामदार, अरुणा चव्हाण, मिना साळुंखे, प्रमुख कारागिर तानाजी शेळके सर्व चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी उपस्तित होते.