विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम या संकल्पनेवर तुम्ही बालवैज्ञानिकांनी हे नवनवीन संशोधन करणे गरजेचे आहे. नवोदित बालवैज्ञानिक निर्मितीस चालना देणे काळाची गरज आहे. संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी शोध संशोधनाकडून लावले जातात. विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करून जनतेला, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणाची निर्मिती करावी असे आवाहन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री .विनायक पाडळकर(IRSE) डेप्युटी चीफ इंजिनीयर, हुबळी यांनी केले. मा. श्री. विनायक पाडळकर हे 2014 च्या यूपीएससी परीक्षेचे ५९ क्रमांक रँकर आहेत व आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
ते विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार ,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ,महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे ,राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान अहमदाबाद, राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर ,नागपूर आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर कराडचे उच्च शिक्षण मंडळ विद्यानगर, कराडचे ,यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने १२वे राज्यस्तरीय इन्स्पायर अवाॅर्ड विज्ञान प्रदर्शन सन २०२२- २३ विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभात बोलत होते. ते म्हणतात की,जशी आपल्याला आपल्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला शुद्ध हवेची गरज लागते. नवोदित बालवैज्ञानिक तयार होणे काळाची गरज आहे. नवसंशोधनाच्या गरजा पूर्ण करणे व नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना देणे तसेच विज्ञान हे माणसाचे जीवनात कशी प्रगती करतो याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. वाढत्या हवेचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भारतातील पाच प्रगत शहरांमध्ये प्रदूषण नियंत्रण संयंत्राची प्राथमिक स्तरावरील चाचणी यशस्वी झाली. त्यातीलच एक कलानगर मुंबई येथे प्रदूषण संयंत्र त्यांनी स्थापन केले आहे, असे त्यांनी आपल्या भाषणांमध्ये नमूद केले .त्यांनी वायु हे प्रदूषण नियंत्रण करणारे संयंत्र त्यांनी तयार केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये बाल्यावस्थेत पासून वैज्ञानिक चिकिस्तक दृष्टी असणे व बाह्य जगाबद्दल विलक्षण कुतूहल वाटणे विज्ञानाच्या रहस्य बद्दलची उकल करावीशी वाटणे ,ही काळाची गरज आहे. वाढते औद्योगीकरण, लोकसंख्या विस्फोट ,निसर्गाचा होत चाललेली हानी. अन्न, वस्त्र, निवारा या व्यतिरिक्त हवेची होत असलेले प्रदूषण याला आळा घालणे अत्यंत गरज आहे .व कर्मप्राप्त आहे. मोठ्या प्रगत शहरांमध्ये हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे .त्यासाठी सर्वांनी मिळून हवा प्रदूषण कमी करण्याबाबत संशोधन करणे गरज आहे. विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यापक वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण माननीय अल्ताफ हुसेन मुल्ला साहेब जनरल सेक्रेटरी श्री.शिवाजी शिक्षण संस्था ,उच्च शिक्षण मंडळ विद्यानगर, कराड यांनी केले. ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन व दीप प्रज्वलानानी झाली. यानंतर स्वागत गीत व विज्ञान गीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गायले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राधा अतकरी संचालिका, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांनी केले. त्यावेळी ते म्हणतात की,नावीन्यपूर्ण निर्माण करणे व त्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. विचार व कल्पनाशक्तीचा उपयोग करून त्यात नावीन्यपूर्णता आणणे गरजेचे आहे. मान्यवरांचे स्वागत कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. बी .केंगार यांनी केले. प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा परिचय कॉलेजचे उपप्राचार्य एस. एल. महामुनी यांनी केले. मनोगत श्रीमती .प्रभावती कोळेकर माध्यमिक. शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकारी, श्रीमती. प्रभावती कोळेकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करून नवनवीन बालशास्त्रज्ञ निर्माण करणे तसेच विचार करण्याची प्रक्रिया त्यांच्यामध्ये रुजवणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे मनोगत मा. श्री. प्राचार्य रामचंद्र कोरडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण ते म्हणाले की, विज्ञानामध्ये उंच भरारी घेणारे प्रेरणादायी होतील असे उपक्रम तुम्ही निर्माण करावा.
या कार्यक्रमाला अरुण काका पाटील संस्थेचे विश्वस्त व सदस्य उपस्थित होते. तसेच दिलीप भाऊ चव्हाण, शभास्करराव कुलकर्णी संस्था सदस्य हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी कराड सन्मती देशमाने, श्रीमती शबनम मुजावर शिक्षणाधिकारी, प्राथमिक सातारा जिल्हा परिषद, राजकुमार अवसरे, वेणूताई चव्हाण कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या ,सौ.सरोदे मॅडम,लक्ष्मण पामते, कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा. गाडे.तसेच या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपकरणाचे परीक्षण करणारे परीक्षक हजर होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा.राजू नेम विज्ञान पर्यवेक्षक तथा इन्स्पायर अवाॅर्ड प्रमुख ,राज्य विज्ञान संस्था,नागपूर यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. व्ही.बी जाधव आणि सौ. शर्वरी पाटील यांनी केले या कार्यक्रमाला कॉलेजमधील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये आलेले सर्व विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक तसेच शिक्षकत्तेर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.