जावळीच्या दुर्गम भागातील रुग्णांची ‘कृष्णा’कडून मोफत आरोग्य तपासणी
जावळीच्या दुर्गम भागातील रुग्णांची ‘कृष्णा’कडून मोफत आरोग्य तपासणी
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
येथील कृष्णा विश्व विद्यापीठ आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जावळी तालुक्यातील वेळे, ढेण, तळदेव, मायणी, देऊर अशा दुर्गम भागातील रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात कृष्णा हॅास्पिटलच्या तज्ज्ञ डॅाक्टरांनी रुग्णांची तपासणी करून, मोफत औषधांचे वितरण केले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील स्थानिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचे आरोग्य सुधारावे, या उद्देशाने कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कोल्हापूर क्षेत्र संचालक मनिकंदा रामानुजम व कोयना क्षेत्र संचालक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुक्यातील वेळे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात कृष्णा हॅास्पिटलच्या तज्ज्ञ डॅाक्टरांनी विविध वाड्यावस्त्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन, ग्रामस्थांना मोफत औषधे दिली. याप्रसंगी वनपाल मारुती करपे, वनरक्षक श्री. सोरटे यांच्यासह वनमजूर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.