साई फिटनेस क्लबचा रक्तदान शिबिर उपक्रम कौतुकास्पद : दिलीपराव चव्हाण
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क–
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्यामुळे व रक्ताचा तुटवडा असल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. काळाची पावले ओळखून येथील साई फिटनेस क्लबने राबवलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन धनलक्ष्मी उद्योग समूहाचे प्रमुख दिलीप चव्हाण यांनी केले.
येथील साई फिटनेस क्लब व कराड येथील महालक्ष्मी ब्लड बँकेच्या वतीने क्लबच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 35 व्यायामपट्टूंनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली. शिबिराचे उद्घाटन श्री. चव्हाण यांनी केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी क्लबचे संचालक अरुण जोगूर, डॉ. विद्या थोरात, पत्रकार सचिन शिंदे, सुरेश दळवी, आकाश सोरटे, मिलिंद पवार, नारायण चव्हाण, पै. अक्षय सुर्वे, वाजीद शेख, शर्मिला शिंदे, सायली चांदणे उपस्थित होते.
अरुण जोगूर यांनी 11 वर्षांपूर्वी साई फिटनेस क्लबची स्थापना केली. स्थापनेपासूनच वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी क्लब अंतर्गत विविध स्पर्धा व रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.
पै. सुर्वे म्हणाले, शास्त्र शुद्ध मार्गदर्शन व योग्य आहाराचा सल्ला यामुळे व्यायामपटू साठी साई फिटनेस ही नवी संजीवनी निर्माण झाली आहे. साई फिटनेसमुळे आरोग्य सुदृढ ठेवण्याबरोबर विश्वासार्हता निर्माण केली असून सामाजिक उपक्रम राबवत वेगळा ठसा उमटवला आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश जोगुर, मारूती नडगिरी, शुभम सुर्यवंशी, राहुल सोन्नद, विनायक मोरे, शरणाप्पा जोगुर, वसीम बागवान, अमीर सय्यद, राहुल पाचुपते, आदित्य पवार यांनी प्रयत्न केले.