शिक्षक बँकेला ७.४२ कोटींचा नफा किरण यादव, शहाजी खाडे; मार्चअखेरीस एकूण ११८० कोटींचा व्यवसाय
शिक्षक बँकेला ७.४२ कोटींचा नफा
किरण यादव, शहाजी खाडे; मार्चअखेरीस एकूण ११८० कोटींचा व्यवसाय
सातारा:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने ३१ मार्चअखेरीस ११८० कोटींचा व्यवसाय केला आहे, तर बँकेस सात कोटी ४२ लाख रुपये ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष किरण यादव व उपाध्यक्ष शहाजी खाडे यांनी दिली आहे.
शिक्षक बँकेचे कामकाज राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे संयुक्त चिटणीस दीपक भुजबळ, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते बलवंत पाटील, जिल्हा प्राथमिक समितीचे नेते शंकर देवरे, जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बँकेची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली असून, ३१ मार्चअखेरीचे बँकेचे भागभांडवल ४१ कोटी, स्वनिधी ३५ कोटी, ठेवी ७०० कोटी, येणे कर्ज ४८० कोटी, गुंतवणूक २७५ कोटी व खेळते भांडवल ८१४ कोटी इतके झाले आहे.
अहवाल वर्षात बँकेपुढे एनपीए व थकबाकीच्या वसुलीचे संचालक मंडळापुढे आव्हान होते. बँकेचे अध्यक्ष किरण यादव यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने नियोजनबद्ध आराखडा तयार करून तो बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे व वसुली विभागामार्फत यशस्वीपणे अमलात आणला. त्यामुळे गतवर्षपिक्षा ढोबळ व निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. २०२४ हे वर्ष बँकेचे शताब्दी वर्ष असून, सभासद परिवर्तन पॅनेलच्या सर्व नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे नियोजन केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी बँकेचे संचालक ज्ञानबा ढापरे, नितीन काळे, पुष्पलता बोबडे, निशा मुळीक, महेंद्र जानुगडे, विशाल कणसे, नितीन राजे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, नितीन फरांदे, विजय ढमाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, संजीवन जगदाळे, विजय बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे व सभासद उपस्थित होते.