वाघेरीतील इफ्तार पार्टीस आ.बाळासाहेब पाटील यांची भेट
मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा; समाजात जातीय सलोखा, एकोपा राखण्याचे आवाहन
वाघेरीतील इफ्तार पार्टीस आ.बाळासाहेब पाटील यांची भेट
मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा; समाजात जातीय सलोखा, एकोपा राखण्याचे आवाहन
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क–
वाघेरी, ता. कराड येथे इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी इफ्तार पार्टी ही गेली 26 वर्षे अखंड हिंदू-मुस्लीम सर्व धर्म समभावाचे उदाहरण आहे. या कार्यक्रमास आ. बाळासाहेब पाटील यांची भेट देवून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या,. तसेच समाजासमाजात जातीय सलोखा व एकोपा राखण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस वाघेरी येथील जामा मशिदीमध्ये उपवास (रोजा) सोडण्यासाठी फळे व सरबत वाटप आ. बाळासाहेब पाटील, तानाजी साळुंखे, माजी सनदी अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी, सह्याद्रीचे संचालक सदाम पवार, दिगंबर डांगे, शिवंम प्रतिष्ठानचे राहुल पाटील, पार्लेचे माजी सरपंच विजय अतकरे, अरविंद कदम, रामदास जाधव, अरुण जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रास्ताविकात रहीम पटेल यांनी मोहम्मद पैगंबर, कुराण व समाजाबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी वाघेरी परिसरातील करवडी, बनवडी, ओगलेवाडी, मेरवेवाडी, पाचुंद येथील ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.
निवृत्त सनदी अधिकारी तानाजी सावंत यांनी आ. बाळासाहेब पाटील यांच्या सारखे समाजाशी नाळ व समाजाची जाण असणारे महाराष्ट्रातील ठराविक नेत्यांमधील एक नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या आदर्श आंनी विचारांवर काम करत असल्याचे सांगितले.
प्रशांत यादव म्हणाले, ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हा चव्हाण साहेबांचा विचार व वारसा आ. बाळासाहेब पाटील चालवीत असल्याचे सांगितले. चांगले नेतुत्व जपण्याची व जोपासण्याची वेळ आली असून आपण अशा नेतुत्वाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. कराड उत्तर हा यशवंतराव चव्हाण यांचा मतदार असून या मतदारसंघात सामाजिक बांधिलकी अखंड ठेवण्यासाठी आपण प्रयत्न व सहकार्य करावे, त्याचाच एक भाग म्हणून ही इफ्तार पार्टी असून परिसरातील नागरिकांनी आपल्यातील सलोखा कायम ठेवावा, असेही आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इम्रान पटेल, मुन्ना पटेल, रहीम पटेल, कमाल मुजावर, गुलाम पटेल, किसन डांगे, राजाराम डांगे, विलास कदम, अर्जुन कदम, जुबेर पटेल, सलीम पटेल, हाशीम पटेल, चंदुलाल पटेल, बशीर मुजावर, मुन्ना टेलर यांनी सहकार्य केले. जुबेर पटेल यांनी आभार मानले. सर्वं मान्यवरांना जांभूळ, चिंच, आवळा, लिंबू, पेरू, सीताफळ या रोपांचे सैदापूरचे कृषी परीवेक्षक विनोद कदम, तंत्र अधिकारी भगवान माने यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थांनी जलयुक्त शिवारमधील अपूर्ण कामे व सिमेंट बंधारे पूर्ण करण्याबाबत मागणी केली.