कोयना वाहतूक संस्थेने विविध व्यवसाय सुरू करून प्रगती साधावी:अॅड.उदयसिंह पाटील
कोयना वाहतूक संस्थेने विविध व्यवसाय सुरू करून प्रगती साधावी:अॅड.उदयसिंह पाटील
संस्थेच्या नविन अशोक लेलंड ट्रकचे पूजन
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
सहकार क्षेत्राने सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडून आर्थिक, सामाजिक विकासाच्या दृष्ठीने समाजातील सामान्य मानसाला सक्षम करण्याचे काम केले आहे. सामाजिक बांधिलकी स्विकारून कोयना वहातूक संस्थेच्या संचालक मंडळाने विविध कल्याणकारी योजना, सेवा सुरु करून संस्थेची प्रगती साधावी असे अवाहन संस्थेचे संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील यांनी केले. कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेने नव्याने खरेदी केलेल्या अशोक लेलंड ट्रक या वाहनाचे पूजन गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर करणेत आले त्यावेळी बोलत होते. यावेळी स्वा. सै. शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे, कोयना वहातूक संस्थेचे चेअरमन टी आर पाटील, व्हा. चेअरमन धनाजी पाटील, संचालक सचिन पाटील, विशाल पाटील, भागवत गोतपागर, राहूल भोसले इ. ची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कोयना सहकारी वाहतूक संस्थेचे चेअरमन टी आर पाटील म्हणाले, सन १९९८ साली स्थापन झालेल्या कोयना सहकारी वाहतूक संस्थेने सुरवातीपासूनच योग्य व्यवस्थापन करून संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम केली आहे. संस्थेच्या स्थापनेच्या उद्देशाप्रमाणे वाजवी भाड्यात प्रवाशी व मालांची वहातूक करणे, मोटारगाड्या व इतर साधणे वाजवी भाड्याने देणे. मोटार ड्रायव्हर्स, क्लिनर्स, जरूर ते तंत्रज्ञ नेमणे, वाहनांच्या दुरुस्तीसाठी वर्कशॉप्स, सर्व्हिसिंग सेंटर्स चालविणे, पेट्रोल पंप, लुब्रिकेटिंग तेले तसेच वाहनांचे सुट्टे भाग विक्री करणे, प्रवाशी व मालवाहतूकीकरीता वाहतुक बुकिंग ऑफिसेस उघडणे व चालवणे इ व्यवसाय करणेचे उद्दिष्ठ असून नजिकचे काळात अग्रगण्य सहकारी वाहतूक संस्था म्हणून नावाजली जाईल अशी ग्वाही चेअरमन टी आर पाटील यांनी दिली.