रीसर्चस् दीपक काळे यांच्या शोध प्रबंधास प्रथम क्रमांक
रीसर्चस् दीपक काळे यांच्या शोध प्रबंधास प्रथम क्रमांक
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटने ‘मायक्रोबेस फॉर सस्टेनेबल फ्युचर’ या विषयावर आयोजित केलेल्या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील मेडिकल मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे सिनियर रीसर्चस् दीपक काळे यांच्या शोध प्रबंधास प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे. दीपक काळे यांना शोध प्रबंध लिहिण्यासाठी कृष्णाच्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे डॉ. कैलास दातखिळे, डॉ. गीता कारंडे, डॉ.एस.आर. पाटील, कल्पना काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर कॉन्फरन्ससाठी मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे हेड डॉ.एस.बी. पाटील, कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. मोहन राजमाने, डॉ.जी.बी. पेंढारकर, डॉ.पी.एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. रीसर्चस् दीपक काळे यांच्या शोध प्रबंधाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे कृष्णा विश्व विद्यापीठाचे चान्सलर डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, डॉ.एम.बी. पवार, डॉ. सुहास कुलकण, डॉ. मधुकर मोटे, डॉ. मीरा लोमटे, विनायक भोसले, लाफांचे अध्यक्ष धर्मेंद्र मगरे, काळे पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे सर्व सहकारी, जिल्ह्यासह राज्यातील सर्व अकलाप सभासद यांनी अभिनंदन केले आहे.