डॉ.संजय जगताप यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ व स्नेह मेळावा संपन्न
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
उच्च शिक्षण कोकण विभागाचे सहसंचालक मा. डॉ.संजय शिवाजी जगताप यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ व सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराडच्या 1984 च्या बी.एस्सी बॅचचा स्नेह मेळावा 40 वर्षानंतर नुकताच थाटात सवंगड्यांसमवेत वेंगुर्ला येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सातारा काँग्रेस सेवा दलाचे प्रमुख शिवाजीराव मोहिते म्हणाले डॉ.संजय जगताप यांनी उच्च शिक्षण कोकण विभागामध्ये प्राध्यापक, प्रशासक तसेच सहसंचालक म्हणून आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवला ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
सत्कारमूर्ती डॉ.संजय जगताप सत्काराला उत्तर देताना म्हणाले, एक विद्यार्थी ते सहसंचालकापर्यंतच्या प्रवासात मित्रमंडळींच्या सहकार्याने आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत यश संपादन केले. या सर्वांविषयी त्यांनी मनोगतात कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा.राजेंद्र देठे यांनी जिद्द,चिकाटी,धडाडी,मेहनत व प्रामाणिकपणा या पंचसूत्रीच्या जोरावर आपण मिळवलेले सहसंचालक उच्च शिक्षण हे पद युवा पिढीस प्रेरणादायी ठरेल,आपण संघर्षातून मिळवलेले यश आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मनोगत व्यक्त केले.
सन.1984 च्या बी.एस्सी बॅचचा 40 वर्षानंतर झालेला स्नेह मेळावा उपस्थितांना जगण्याची उमेद आणि नवी ऊर्जा देऊन गेला असल्याचे मनोगतात माजी उपमुख्याध्यापक श्री अनिल शिर्के यांनी व्यक्त केले.
मा.संजय जगताप,सौ गीता जगताप या उभयतांना शाल, श्रीफळ, श्रींची मूर्ती व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्त व स्नेह मेळावा याविषयी सुजाता पाटील,ए.एन. मुल्ला,सुनीता देठे,विलास यादव, आटपाडकर सर,ढेरे सर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकांत माने.रामचंद्र क्षीरसागर,विजय जाधव, शिरीष पाटील,हरीश सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री वसंतराव मोहिते यांनी केले तर सन्मानपत्राचे वाचन मा.उप मुख्याध्यापक श्री शेखर शिर्के यांनी केले.उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार दत्ता धुमाळ यांनी मानले.